+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Mar 24 person by visibility 149 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
संतांच्या जीवनावरील 'विठू माझा लेकुरवाळ' हे महानाट्य मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तपोवन मैदानावर सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वामिनी क्रिएशनचे निर्माते दिग्दर्शक अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. एक मे ते सात मे या कालावधीत महानाट्य होणार आहे.
संतांच्या जीवनावर महाराष्ट्रात प्रथमच महानाट्य होत असून या महानाट्यात २०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत . महानाट्यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा भव्य सेट उभारण्यात येणार आहे. तसेच हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांच्याही सहभाग होणार असून त्या दृष्टीने कलाकारांशी बोलणी सुरू आहे. संतांचे विचार या महानाट्यातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महानाट्यासाठी अंदाजे ७० लाख रुपये खर्च येणार असून त्या दृष्टीने स्वामिनी क्रिएशनच्यावतीने प्रयत्न सुरू केले जात आहेत. कोल्हापूर शहरासह गावागावात तिकीट विक्री केली जाणार आहे. महानाट्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने विठ्ठल भक्तांनी हातभार लावावा ,असे आवाहनही करण्यात आले. पत्रकार परिषदेला उत्तम पवार, सुनील चौगुले, तेजस्विनी देसाई, सविता सुतार उपस्थित होत्या.