+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Apr 24 person by visibility 52 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी पेठेतील फिरंगाई देवीचा पालखी सोहळा शुक्रवारी (२६ एप्रिल) रात्री उत्साहात पार पडला. देवीच्या पालखी सोहळयाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आकर्षक रांगोळया, फुलांच्या पायघडया, फटाक्यांची आतषबाजी आणि फिरंगाई देवीच्या नावानं चांगभलं…अशा जयघोषात पालखी सोहळा पार पडला. पालखीची फुलांनी सजावट केली होती. फिरंगाई तालीम मंडळतर्फे आयोजन केले होते.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळयाला प्रारंभ झाला. मधुरिमाराजे छत्रपती व शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. चांगभलंच्या गजरात पालखी मार्गस्थ झाली. कोंडेकर गल्ली, फिरंगाई तालीम, विद्यार्थी कामगार चौक, वेताळमाळ चौक, इंगवले गल्ली, लाल चौक ते फिरंगाई मंदिर या मार्गे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
फिरंगाई तालीम मंडळाचे अध्यक्ष रविकिरण इंगवले, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, जयश्री चव्हाण, आबासाहेब जगदाळे, रावसाहेब इंगवले, उमेश पाटील, राकेश जगदाळे, राजू घोरपडे, प्रताम माने, राहुल इंगवले, ऋषी इंगवले, सौधन अपराध, चंद्रदीप नवरुखे, ऋग्वेदा इंगवले, सचिन कारंडे, रोहिणी वाकडे, नेहा इंगवले, बाळासाहेब ठोंबरे, डॅनी इंगवले, विश्वास पोवार, सचिन मांगले, बाजीराव नाईक यांच्यासह भाविक मोठया संख्येने पालखी सोहळयात सहभागी झाले.