+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Apr 24 person by visibility 52 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘खासदार संजय मंडलिक यांच्याकडे वजूद नाही. पाच वर्षात त्यांनी कोणतेही मोठे विकासकाम केले नाही. आग लगी बस्ती में, हम तो मस्ती में अशा थाटात त्यांचा वावर असतो. मात्र कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. विकलेला खासदार स्वीकारणार नाही’असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. खासदार संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक हे सोयीनुसार राजकारण करतात. जिकडे भेळ तिकडे खेळ अशी त्यांची निती आहे. असा टोलाही त्यांनी लगाविला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ सदर बाजार येथे जाहीर सभा आयोजित केली होती. आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या पुढाकारातून सभेचे आयोजन केले होते. सभेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. उपस्थितांनी हात उंचावत घोषणा देत शाहू छत्रपतींना निवडून आणू असा संकल्प केला.
या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचे वाभाडे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘’गोडबोले, साखरझेले’ अशा शेलक्या शब्दांत केला. अंधारे यांनी भाषणात, ‘शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंडलिकांना निवडून आणण्यासाठी गेल्या निवडणुकीत सभा घेतल्या, खासदार केले त्या पक्षप्रमुख ठाकरे व मातोश्रीशी ते गद्दारी करू शकतात. तर सामान्य मतदारांना चुना लावायला ते मागे कमी नाहीत.
 खासदार मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक हे सोयीनुसार राजकारण करतात. जिकडे भेळ तिकडे खेळ अशी त्यांची निती आहे. व्यक्तीगत स्वार्थापुढे त्यांना दुसरे काही दिसत नाही. लोकसभा एका पक्षाकडून विधानसभेला दुसराच पक्ष अशी त्यांची पद्धत. सोयीनुसार पक्ष बदल करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून हात दाखवा आणि शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवा. ’असे आवाहन अंधारे यांनी केले.
आमदार जयश्री जाधव म्हणाले, ‘कोल्हापूरची अस्मिता जपण्याची वेळ आहे. भाजप फोडाफोडी आणि जातीधर्मात भेदाभेदचे राजकारण करत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी हात या चिन्हावर बटण दाबून शाहू छत्रपतींना विजयी करा.’ याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक भंडारे, आपचे संदीप देसाई, कॉम्रेड अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, आरपीआयच्या रुपा वायंदडे, राजाराम धनवडे यांची भाषणे झाली. बी. एस. कांबळे यांनी आभार मानले. व्यासपीठावर माजी महापौर भीमराव पोवार, काँग्रेसच्या कार्यकर्त्या सरला पाटील, माजी नगरसेवक महेश जाधव, तौफिक मुल्लाणी, शिवसेनेचे रवी चौगुले, हर्षल सुर्वे, महिला संघटक स्मिता सावंत, विशाल देवकुळे, मनजित माने, सरदार कांबळे, नागेश वडार, श्रीपती साळोखे आदी उपस्थित होते.
…………
मोदींचे मन की बात केवळ उद्योगपतीसाठी
 ‘पंतप्रधान मोदी हे मन की बातमधून गरीबाविषयी बोलत नाहीत तर उद्योगपतींच्या हिताच्या गोष्टी करतात. गरीब गरीबच राहिला पाहिजे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण झाली पाहिजे असे भाजपाचे धोरण आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा विचार आपणाला पुढे न्यायचा आहे. शाहू महाराज होते म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले. आंबेडकर घडले म्हणून तुम्ही-आम्ही सन्मानाने जगत आहोत. समतेचा हाच विचार शाहू छत्रपतींच्या माध्यमातून दिल्लीत पाठवायचा आहे. ”
-राजू लाटकर, माजी नगरसेवक
……………………………………..
जेवढा मोठा भ्रष्टाचारी, तेवढे मोठे पद ही मोदी गॅरंटी
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘विश्वगुरुचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी ही सर्वसामान्य नागरिकांची उन्नती, सुशिक्षत तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आणि महिलांची सुरक्षितता या संबंधी नाही तर जेवढा मोठा भ्रष्टाचारी, तेवढे मोठे पद. भ्रष्ट नेत्यांना मंत्रीपद आणि गुन्हेगारांना अभय ही मोदी गॅरंटी आहे. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात लोकहिताची नऊ विकासकामे सांगावीत. महागाईवर नियंत्रण, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षितता याविषयी हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारचा संविधान व घटना बदलण्याचा डाव आहे. आपली पुढची पिढी मोकळा श्वास घ्यायची असेल, खुल्या वातावरणात राहायची असेल तर भाजपा सरकारला हटविण्यासाठी हात चिन्हावर बटण दाबून शाहू छत्रपतींना विजयी करा.