+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Apr 24 person by visibility 67 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. यामध्ये एक पोलिस निरीक्षक, पाच सहायक फौजदारासह नऊ पोलिस हवालदारांचा समावेश आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी (२६ एप्रिल) पुरस्काराची यादी जाहीर केली. पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यातील ८०० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नागरी हक्क संरक्षणकडील पोलिस निरीक्षक पुष्पलता मंडले, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल गणपतराव पाटील (ईस्पुर्ली), विजय पांडूरंग कोळी (जुना राजवाडा), उदय तुकाराम साळोखे (मुख्यालय), राजेंद्र मोहन कलगुटकर (राजारामपुरी), सर्जेराव आनंदराव पाटील (विमानतळ), हवालदार विष्णू पांडूरंग गुरव (मोटर परिवहन), सतीश राजाराम सुर्यवंशी (मोटर परिवहन), सचिन सुर्याशी पाटील (पोलिस अधीक्षक कार्यालय), राजेश बाबूराव गायकवाड (एलआयबी), संदीप दिनकर पाटील (शाहूपुरी), बाबाचाँद मन्सूर पटेल (शिरोळ), वाजीद हसन मोमीन (शिवाजीनगर), विनोद जयसिंग ढवळे (मोटर परिवहन) आणि विजय भास्कर जाधव (शहर वाहतूक शाखा) यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात विविध गुन्हयांच्या तपासातील कामगिरीची दखल घेऊन पदक दिले जातात.