+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Apr 24 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येत्या तीन महिन्यात शहरासह उपनगरातील झोपडपट्टीधारकांना कार्ड उपलब्ध करून झोपडपट्टीधारकांच्या मागणीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन आराखडा तयार करून झोपडपट्टीधारकांचे राहणीमान उंचावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
 महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर चौक येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
 क्षीरसागर यांनी, गेल्या ६० दशकात कॉंग्रेस सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या झोपडपट्टीधारकांची फसवणूक केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टींपासून झोपडपट्टीधारकांना वंचित ठेवून त्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. निवडणुकीपुरता त्यांच्या मतांचा वापर करून अनेक आमिषे दाखवली गेली पण प्रत्यक्षात निवडणुकीनंतर याठिकाणी फिरकण्याचे कष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांना घेता आले नाही. याउलट गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जगातील सर्वात मोठी आयुष्यमान भारत आरोग्य योजना, मुलींच्या जन्माचे स्वागत करणारी सुकन्या समृद्धी योजना, राज्य सरकारकडून महिलांना एस.टी.प्रवासात ५० टक्के सुट, मुलीना मोफत उच्च शिक्षण, आनंदाचा शिधा याद्वारे गोरगरिबांच्या हक्काच्या गरजा पूर्ण करण्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गोरगरीब जनता राहील असा विश्वास व्यक्त करत महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, प्रभू गायकवाड, रणजीत जाधव, माजीज्ञनगरसेवक अमोल माने, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर उपस्थित होते.