+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआंबा महोत्सवाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद adjustशिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन ! ३०० कलाकार होणार सहभागी adjust टेनिस स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात adjustकोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव adjustगावात नो डॉल्बी, नो डिजीटल फलक ! शांतता-सामाजिक सलोख्याचा माणगाव पॅटर्न !! adjustन्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के adjustकोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ adjustजिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन adjustनिधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना ! adjustगोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Mar 21 person by visibility 13002 categoryआरोग्य

 नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता !! मास्कचा वापर करावा, सोशल डिन्स्टन्सिंग राखावे

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोरोना संसर्गाची दुसऱ्या टप्प्याची लाट आल्यासारखी सर्वत्र रुग्ण संख्या वाढ आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंगणिक भर पडत आहे. आरोग्य विभाग आणि नागरिकांसाठी कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर शहरातील सात ठिकाणे ही कोरोनाबाबत ‘हॉट स्पॉट’म्हणून जाहीर केली आहेत.

शहरातील हॉट स्पॉट म्हणून घोषित केलेल्या ठिकाणामध्ये ‘शुक्रवार पेठ, शिवाजी पेठ, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, लक्ष्मीपुरी,शिवाजी विद्यापीठ परिसर, मार्केट यार्ड’ या भागाचा समावेश आहे.

 गर्दीचा परिसर, बाजारपेठा यामुळे या भागात मोठी वर्दळ असते. अनेकदा सामाजिक अंतरही राखले जात नाही. यामुळे या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू शकते. नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी, सरकारी नियमांचे पालन करुन कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

.................

केंद्र सरकारने शहरातील सात ठिकाणे ‘हॉट स्पॉट’म्हणून जाहीर केली आहेत. या भागात नागरिकांनी गर्दी टाळावी. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करावे. मास्कचा वापर करावा. बाजारपेठा व गर्दीच्या परिसरात जाऊ नये. प्रतिबंधात्मक उपाय करावेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रतिबंधात्मक उपायासाठी हलगर्जीपणा केल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो.

निखिल मोरे, उपायुक्त कोल्हापूर महापालिका

...............................

मार्केट यार्ड परिसरात मार्गदर्शन

महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी शनिवारी राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व लसीकरणासंबंधी मार्गदर्शन केले. नागरिकांना आरोग्य सेवा, उपचाराविषयी माहिती दिली.

……………..

शुक्रवारी जिल्ह्यात ८३ रुग्ण आढळले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६८५ पर्यंत पोहचली आहे. शुक्रवारी (ता.२६ मार्च) कोल्हापूर जिल्ह्यात ८३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोल्हापुर शहरातील रुग्ण संख्या २५ आहे.