+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Apr 24 person by visibility 56 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या उद्योगश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक अजितकुमार पाटील (लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेस), संभाजीराव पाटील (पाटील इंजिनीअरिंग वर्क्स), उषा पन्हाळकर (पन्हाळकर इंजिनीअरिंग वर्क्स) यांना केईए उद्योगश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. दिवंगत बाबूराव मुळीक (भारत कॅम इंडस्ट्रीज) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी, २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. बेळगावच्या मे. अशोक आर्यन वर्क्सचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते पुरस्कारांच वितरण होईल. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. इंजिनीअरिंग असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात हा कार्यक्रम आहे. याप्रसंगी असोसिएशनच्या अमृतमहोत्सवी वाटचालीमध्ये योगदान देणारे असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाबाभाई वसा, अॅड. अशोक उपाध्ये, सीए एस. एस. पोवार, जीएसटी सल्लागार अॅड. विनायकराव आगाशे, उद्योगपती सचिन मेनन यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिव प्रसन्न तेरदाळकर, संचालक दिनेश बुधले, संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.