+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Apr 24 person by visibility 182 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा झाली. या सभेसाठी  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शक्तीप्रदर्शन करून शहरात हजारो दुचाकींची रॅली काढली. आणि हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या सोबत सभेला उपस्थिती दर्शविली.  दरम्यान दुचाली रॅलीने शहरातील वातावरण भगवेमय झाले. शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ येथून रॅलीला सुरुवात झाली. दसरा चौक बिंदू चौक मिरजकर तिकटी नंगीवली तालीम चौक मार्गे रेसकोर्स नाका येथे समाप्त करण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांनी केले. यामध्ये युवा वर्गाची लक्षणीय गर्दी दिसून आली.