+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Apr 24 person by visibility 714 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील किणी येथील मे सम्राट फूडस रेस्टॉरेंटवरील कारवाई थांबविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकारी किर्ती धनाजी देशमुख (विश्व रेसिडेन्सी, ताराबाई पार्क ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. शुक्रवारी (२६ एप्रिल) ही कारवाई झाली. देशमुख या अन्न व औषध प्रशासन कार्यालय कोल्हापूर येथे अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होत्या.
  त्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील समर्थनगर मोहोळ येथील आहेत. देशमुख यांना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर देशमुख यांच्या घराची झडती घेण्यात आली. यामुळे ८० तोळे सोने, साडेतीन लाखांची रोख रक्कम व डायमंडच हार सापडला आहे.
या कारवाईबाबतची अधिक माहिती अशी, महिला अधिकारी देशमुख यांनी १५ मार्च २०२४ रोजी सम्राट फूडस रेस्टारेंटची तपासणी करुन अन्नपदार्थाचे नमुने घेतले. या रेस्टारेंटवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. देशमुख यांना त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये लाच घेताना पकडण्यात आले.
 त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक बंबरगेकर, सहायक फौजदार भंडारे, पोलिस हवालदार सुधीर पाटील, पूमन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.