+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 24 person by visibility 278 categoryआरोग्य
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लहान मोठ्या आकारातील विविध जातीची कंदमुळे, औषधी वनस्पती आणि त्यांची उपयुक्तता हे सारे उलगडून दाखवणारा उत्सव कोल्हापुरात भरला आहे. एनजीओ कंपेशन २४ वुई केअर यांच्या पुढाकाराने हे अनोखे प्रदर्शन भरविले आहे.
या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (२० जानेवारी २०२४) सकाळी करण्यात आले. दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदर्शन आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही.एन. शिंदे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, संयोजक मिलिंद धोंड, प्राचार्य मधुकर बाचूळकर, प्राचार्य अशोक वाली, शहाजी कॉलेजचे प्राचार्य राजेखान शानेदिवाण, प्रोजेक्ट समन्वयक सुशांत टक्कळकी, सहमन्वयक अमृता वासुदेवन, मोहन माने, भूषण पाटील, आरती रायगांधी, अभिजीत पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात सत्तरहून अधिक जातीची कंदमुळे, औषधी वनस्पतींच्या १६० जाती पहावयास मिळतात. वेगवेगळ्या भागातून कंदमुळे संकलित केले आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांची गर्दी होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दुपारी प्रदर्शन स्थळी भेट दिली. हे प्रदर्शन रविवार 21 जानेवारी सायंकाळी सहापर्यंत खुले राहणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे.