+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेखान जमादारांच्या विरोधात पत्रकारांची निदर्शने adjustशिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन adjustकोल्हापूर केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ! ३९ संचालकांची कार्यकारिणी !! adjustमुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजुक तुपाची चव adjustसंयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणूक उत्साहात adjustतात्यासाहेब कोरे आयटीआय विद्यार्थ्यांची टाटा कंपनीत निवड adjustगार्डन्स क्लबतर्फे मुलांसाठी उन्हाळी शिबिर adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा प्रारंभ adjustकेआयटी आयआरएफच्या १० स्टार्टअप्सना ५० लाखांचा निधी मंजूर adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Apr 24 person by visibility 136 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या अमृत संजीवनी योजनेवरुन सत्ताधारी संचालक मंडळाने आता सावध पवित्रा घेतला आहे. ज्यांनी या योजनेत सहभागी व्हायचे नाही असे अर्ज केले होते त्यांचेच पैसे व्याजासह त्यांच्या ठेवीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) व महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने, या योजनेच्या अंमलबजावणीवरुन सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर आक्षेप नोंदवित. जिल्हा उपनिबंधकाकडे दाद मागितली होती. सभासदांच्या संमतीविना रक्कम कपात करणे हे चुकीचे असल्याचे विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा उपनिबंधकांनी यासंबंधी बँकेला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संचालक मंडळाने नवा निर्णय घेतला.
 या योजनेसंबंधी सत्ताधारी संचालक मंडळातर्फे भूमिका मांडताना बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, ‘ अमृत संजीवनी योजना अंमलात आल्यापासून काही ठराविक मंडळींनी बँकेला झालेल्या तीन कोटी बावीस लाख रुपये नफ्यावरचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक या योजनेत खुसपाट काढण्याचा प्रयत्न केला. मोजक्या पाच-पन्नास लोकांसाठी, सहा हजार सभासदांच्या दुःखाच्या काळात आधारस्तंभ ठरणारी ही योजना अडचणीत येऊ नये यासाठी संचालक मंडळाने पारदर्शकता ठेवून नकार देणाऱ्या अर्जांना मंजुरी दिली आणि त्या तक्रारदार सभासदांचे पन्नास हजार रुपये व्याजासह त्यांच्या ठेवीकडे पुन्हा वर्ग केले. त्यामुळे ज्यांना ही योजना हवी आहे अशा उर्वरित हजारो सभासदांना या योजनेचा लाभ आता विना व्यत्यय घेता येईल.ज्यांनी मला या योजनेत सहभागी व्हायचे नाही. आमचे पैसे परत द्या अशा प्रकारचे अर्ज दिले होते त्यांचेच पैसे मागील व्याजासह त्यांच्या ठेवीकडे वर्ग करण्यात आले आहेत. मयत सभासदांच्या वारसांना खऱ्या अर्थाने संजीवनी ठरलेली ही अमृतमय योजना कुणी यातून बाहेर पडले म्हणून कदापिही बंद होणार नाही.”
प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे नेते राजाराम वरुटे म्हणाले, “बँकेच्या सगळया सभासदांच्या हिताचा विचार करुन आमचा लढा सुरू होता. सभासदांच्या हिताच्या लढयाला यश आले अशी आमची भावना आहे. सत्ताधारी संचालकांनी कोणालाही विश्वासात न घेता परस्पर अमृत संजीवनी योजना राबवली. यामुळे सभासदांमध्ये रोष होता. पूर्वी संपूर्ण कर्जमाफी योजना होती. एक लाख कर्जासाठी तीनशे रुपये कपात व्हायचे. २५ लाख रुपयांचे कर्ज असल्यास साडे सात हजार कपात केली जायचे. ज्यांचे जेवढे कर्ज त्यांना तेवढा लाभ. कर्जाचे प्रमाण कमी झाले की कपातीची रक्कमही कमी व्हायची. सत्ताधारी संचालक मंडळाच्या नव्या योजनेमुळे ज्यांचे कर्ज नाही, त्यांनाही भुर्दंड बसत होता. योजनेचा सरसकट लाभ मिळायला हवा. मात्र नव्या योजनेत तो उद्देश दिसत नाही. म्हणून सभासद हितासाठी शिक्षक संघाने लढा दिला. आता संचालक मंडळाने ज्यांना योजनेत सहभागी व्हायचे नाही त्यांची ५० हजार रुपयाची रक्कम ठेवीकडे वर्ग केली जात आहे. मात्र जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या व्याजाचे काय ?’
  पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, “ सभासदांच्या संमतीविना वर्गणी कायम ठेव खातेवरून अमृत संजीवनी योजनेस वर्ग केलेले ५० हजार रुपये माझ्या वर्गणी कायम ठेव खात्यात परत जमा केले आहेत. मागणी अर्जातील एका मुद्यानुसार बँकेने रक्कम परत जमा केल्याबद्दल धन्यवाद. तथापी विनासंमती खात्यातून रक्कम काढून.. बेकायदेशीर व्यवहार करून नाहक त्रास दिल्याबद्दल सनदशीर मार्गाने सुरू असलेला लढा सुरूच राहील. मग सत्तेत कोणीही असो, कोणी काहीही म्हंटले तरी आमचा लढा कायम असेल. सभासद कल्याण योजना वीस वर्षापासून सुरू आहे. जुन्या योजनेत पाच हजार गुंतवणूक होती. कर्जाच्या प्रमाणात निधी कपात केला जात होता. सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने जुनी योजना बंद करुन, सभासदांना विश्वासात न घेता ५५ हजार रुपये ठेवीची अमृत संजीवनी योजना सुरू केली. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सभासदांच्या समंतीविना त्याच्या खात्यातून ५० हजार रुपये वर्ग केले. समंतीविना पैसे वर्ग करण्याचा हा व्यवहार बेकायदेशीर आहे. त्यामुळे या योजनेविरोधात लढा दिला.’