काँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर
schedule28 Apr 24 person by visibility 343 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी कोल्हापूर : काँग्रेसला जे ४०-५० वर्षात जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केले म्हणणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांना असे विधान करताना लाज कशी वाटली नाही..? काँग्रेस होती म्हणून तुमच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील माणूस आमदार झाला हे विसरू नका..असे प्रत्युतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिले..
पत्रकात व्ही.बी यांनी म्हटवले आहे , " पंतप्रधान मोदी यांच्या सभेमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी ४० वर्षात काँग्रेस पक्षाने काय केले ? असे आपल्या भाषणात विचारले. खरे तर कालच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिम लोकांना देणार आहेत असे विधान केले आहे. हे विधान मुळात मान्य आहे काज्ञ? गेल्या ४० वर्षात जर देशात काँग्रेस पक्ष नसता तर कोणतीही घराण्याची पार्श्वभूमी नसताना सामान्य मुस्लिम कार्यकर्त्याला विविध स्वराज्य संस्था आमदारकी मंत्रीपद मिळाले असते का ? कॉंग्रेसच्या पुरोगामी विचारांमुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती आमदार आणि मंत्री आहे. वरील विधान करण्यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी एवढा तरी विचार करायचा की भाजपकडून आपल्याला आमदारकी मंत्रीपद राहू दे ग्रामपंचायतीमध्ये तरी संधी मिळाली असती का..? आतापर्यंत ईडीला घाबरून तुम्हीच ज्यांना वडिलासमान मानत होता त्या शरद पवार यांच्याविरोधात बोलू लागला. आता त्याच्या पुढे जाऊन ज्या पक्षाने आपल्याला आमदार, मंत्री केले, अल्पसंख्याक समाजातील नेता म्हणून राजकारणाला बळ दिले त्या पक्षाने काय केले म्हणून विचारणा करून तुमच्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे हेच दाखवून दिले आहे. काही झाले तरी आपण विधानसभेला निवडून येत नाही ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे..आपण मोदी यांना रामलल्लाच्या कितीही मुर्ती भेट दिल्या तरी तो राम आता आपल्या सारख्या गद्धारांना पावणार नाही हे लक्षात ठेवा...आणि एवढेच जर भाजपबद्धल प्रेम उफाळून आले असेल तर ज्या काँगेसच्या मतावर तुम्ही निवडून आला त्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग खुशाल भाजपच्या पालखीचे भोई व्हायला जा...असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे..