+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहज यात्रेकरूंना मुस्लिम बोर्डिंग येथे होणार लसीकरण adjustराजेखान जमादारांच्या विरोधात पत्रकारांची निदर्शने adjustशिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन adjustकोल्हापूर केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ! ३९ संचालकांची कार्यकारिणी !! adjustमुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजुक तुपाची चव adjustसंयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणूक उत्साहात adjustतात्यासाहेब कोरे आयटीआय विद्यार्थ्यांची टाटा कंपनीत निवड adjustगार्डन्स क्लबतर्फे मुलांसाठी उन्हाळी शिबिर adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा प्रारंभ adjustकेआयटी आयआरएफच्या १० स्टार्टअप्सना ५० लाखांचा निधी मंजूर
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Apr 24 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये विविध सांख्यिकी पदावर मोठ्या प्रमाणात यश  मिळवले. सरकारच्या विविध विभागांद्वारे आयोजित परीक्षात ३२ विद्यार्थ्यांनी बाजी मारली. 
राज्य सरकारच्या सांख्यिकी संचानालयाद्वारे संशोधन अधिकारी पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सरिता बाळासो वारके व नीलम तानाजी पाटील यांची निवड झाली आहे.  पृथ्वीराज विठ्ठल झांबरे व निकेत गणेश जाधव यांची इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मार्फत राष्ट्रीय पोषण संस्था- हैदराबाद व राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान, पुणे येथे येथे तांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. मुकुंद शशिकांत बाचनकर, सुवर्णा दगडू मळावे, सोनम महादेव लंगुटे, आदिनाथ तुकाराम पाटील व विशाखा विलास पाटील यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दलाचे प्रमुख) कार्यालय येथे वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक म्हणून रुजू झाले आहेत.
 पृथ्वीराज विठ्ठल झांबरे, विशाल बापू झिटे, प्रतीक सदाशिव दामते, ओंकार प्रभाकर पाटील, प्राजक्ता महादेव जाधव, माधुरी विनायक नाझरे, शुभांगी महादेव स्वामी, मेघना नारायण साळवे, आदिनाथ तुकाराम पाटील, दिपाली दशरथ करणे, वैभव रामदास सुराशे, विक्रांत माणिक रास्ते, उत्कर्ष उत्तम शेलार, सोनम तात्यासाहेब साठे, सृष्टी शिवाजी मोरे, निकेत गणेश जाधव, स्वप्नाली प्रदीप पवार, शुभांगी मारुती शेंडगे, सोनम महादेव लंगुटे, सुवर्णा दगडू माळवे, किरण मल्हारी चोथे, आणि विशाखा विलास पाटील अशा एकूण २२ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांख्यिकी अन्वेषक म्हणून निवड झाली आहे.
दादासाहेब गोडसे, शिल्पा पाटील, शाईन मुजावर, सुनील मोरे, ओंकार पाटील, शुभांगी पाटील, कृष्ण माळी, श्रुती ओतारी आणि अशोक भोसले अशा एकूण ०९ विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड होऊन रुजू झाले आहेत.   यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ, व्ही. एन. शिंदे, विभागप्रमुख डॉ. एस. बी. महाडिक तसेच अधिविभागातील सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.