+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेखान जमादारांच्या विरोधात पत्रकारांची निदर्शने adjustशिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन adjustकोल्हापूर केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ! ३९ संचालकांची कार्यकारिणी !! adjustमुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजुक तुपाची चव adjustसंयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणूक उत्साहात adjustतात्यासाहेब कोरे आयटीआय विद्यार्थ्यांची टाटा कंपनीत निवड adjustगार्डन्स क्लबतर्फे मुलांसाठी उन्हाळी शिबिर adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा प्रारंभ adjustकेआयटी आयआरएफच्या १० स्टार्टअप्सना ५० लाखांचा निधी मंजूर adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Apr 24 person by visibility 56 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशाच्या प्रगतीसाठी प्रा. संजय मंडलिक यांना साथ द्या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बाजार समितीमध्ये "मिसळपे चर्चा....." या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.
  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसनशील भारत ही ओळख पुसून विकसित भारत हा नवा लौकिक निर्माण केला आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भारतवासीयांना कल्याणकारी योजना देण्याचे मोठे कार्य केले आहे. म्हणूनच त्यांना  तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत ही सबंध भारतवासीयांची भावना आहे.
    खासदार धनंजय महाडिक म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी महायुतीमधील सर्वच घटक समन्वयाने नियोजनबद्ध कामाला लागले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याची शपथ घेऊया.*
 ........................
बाजार समितीच्या समस्या........!                 
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, बाजार समितीच्या कोणत्याही अडीअडचणी असू देत. त्यासाठी मी सदैव तत्पर आहे. फक्त एक आवाज द्या, कोणतीही तुमची कोणतीही समस्या सोडूवू, असे ते म्हणाले.  बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू यांनी केले.  संचालक सूर्यकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम,  यशोवर्धन मंडलिक, सुजित चव्हाण, महेंद्र चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती शंकर पाटील, असिफ फरास, शिवाजी जाधव, बाळासाहेब पाटील, आप्पा लाड, संजीव परीख, निलेश पटेल, जमीर बागवान, नईम बागवान, अशोक अहुजा  उपस्थित होते.*
...........................