+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Apr 24 person by visibility 65 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिरोली पुलाची येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांसाठी सहकार्याचे आवाहन केले. दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर त्यांनी महाडिकांची भेट घेतली.
तब्बल दोन तास महाडिक यांचे निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचे सत्र चालू असल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्री शिंदे यांनी महाडिक यांच्याशी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली. 
यावेळी महाडिक यांनी ,"महाडिक परिवाराची संपूर्ण ताकद महायुतीचे उमेदवारांच्या पाठीशी असून हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील" असा विश्वास व्यक्त केला. "कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाडिक गटाची ताकद लक्षणीय असून हे सर्व कार्यकर्ते दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील " असा शब्द दिला.
दरम्यान माजी आमदार  महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन महाडिक कुटुंबीयांच्यावतीने सत्कार केला. उद्योजक स्वरूप महाडिक यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष्या शौमिका महाडिक, उद्योजक  महाडिक, मंगल महाडिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते .
 यावेळी मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री रामदास कदम, खासदार  माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवाजीराव पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अखिलेशसिंह घाटगे यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.