महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागामध्ये इंडो जर्मन टुल रूम, औरंगाबाद या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्राम मधील दहा विद्यार्थांची नोकरीसाठी इंडो जर्मन टुल रूम, औरंगाबाद येथे निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राची पावसकर,ऋषिकेश पदमन,संदीप आंभोरे,संदीप बोलंगे,सुजित रणदिवे,मोहनीश लोहार,अजय गुजले,प्राची चव्हाण,निकिता दुधाळ,शुभम कारीदकर यांचा समावेश आहे.
कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर गणेश पाटील , प्रा. सतीश काळे व सागर पोर्लेकर यांनी केले. आतापर्यंत मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्रॅम मधील विद्यार्थ्यांची ॲक्वा चिल सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, इलेक्ट्रॉनिका हाय टेक मशीन टूल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मेहता कॅड कॅम सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, बी व्ही जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, घाटगे पाटील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर, पारिख मेटाकास्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर, व्हर्साटाइल प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर अशा विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तंत्रज्ञान अधीविभाग संचालक डॉ. एस. एन. सपली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्राम चे समन्वयक डॉ. अभिजीत कोळेकर आणि सेंट्रल प्लेसमेंट सेल ऑफिसर डॉ. राजन पडवळ यांचे मार्गदर्शन लाभले.