+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रामसेवकांच्या विरोधात सीईओंच्याकडे तक्रारी adjustकेआयटी रेडी इंजिनियरमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल adjustप्रा.ऋतुराज कुळदीप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन adjustख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मनोरंजननगरी, माशांच्या नानाविध जाती ! adjustडीवाय पाटील फार्मसीत जी पॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन adjustआचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक ! शिक्षक संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट adjustजिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली ! फायलींचा प्रवास-दिरंगाई समोर येणार !! adjustशहर अभियंता सरनोबतांना कारणे दाखवा नोटीस ! कामातील दिरंगाई भोवली !! adjust केवळ पुस्तकी ज्ञान नको, यशस्वी उद्योजक बना : वारणा अभियांत्रिकीचा गुणगौरव सोहळा उत्साहात adjustहज यात्रेसाठी जाणार्‍या ३१९ भाविकांना लसीकरण
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Apr 24 person by visibility 155 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाविकास आघाडीचे  उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ एक मे रोजी गांधी मैदान येथे  शिव शाहू निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.  सभेला मोठी गर्दी करण्याचे नियोजन आहे ही सभा यशस्वी करू या असे आवाहन आमदार सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले.
  आमदार सतेज पाटील म्हणाले, या सभेची माहिती लोकांच्यापर्यंत पोहचवा. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना या सभेसाठी मोठ्या संख्येन उपस्थित ठेवावे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 
 यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ होणारी ही भव्य सभा यशस्वी करूया असे आवाहन केले. गेली २५ दिवस आपणं सर्व जण प्रचारात आहोत. सोशल मीडियावरून आता काहीही अफवा पसरवण्यात येतील. मात्र येणाऱ्या काळात सर्वांनी दक्ष राहून काम करुया. आपापल्या भागातील लोकांच्या पर्यंत या सभेची माहिती पोहचवा. लोकांना या सभेसाठी निमंत्रित करा अस आवाहनही आमदार  पाटील यांनी बैठकीत केले.

 या सभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह इंडिया आघाडीतील, घटक पक्षातील प्रमुख नेते व्यासपीठावर असतील. पाच वाजता सभा सुरु होईल. त्यामुळं सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी यावं. अशा सूचनाही माजी आमदार मालोजीराजे यांनी केल्या.  
दरम्यान यावेळी आमदार पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी मैदानाच्या ठिकाणी पाहणी केली. येणाऱ्या लोकांच्या करिता वाहन पार्किंग व्यवस्था, लोकांची बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबत त्यानी माहिती घेवून सूचना केल्या. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख आर के पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,  शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे,  आर.डी. पाटील, राजू लाटकर, कॉम्रेड सतीश कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई,  उपस्थित होते.