+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Apr 24 person by visibility 146 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
साळोखेनगर येथील डी वाय पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्तरावरील टेकनिकल इव्हेंट ‘इन्वेंटो २०२४’ उत्साहात झाला. या इव्हेंटचे उद्घाटन शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. रणजित सावंत यांच्या हस्ते झाले.
डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात अभ्यासाबरोबरच टेक्निकल ज्ञान आवश्यक असलेचे नमूद केले. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या करत आहेत तरी विद्यार्थ्यांनी सुद्धा इंडस्ट्री मधील गरजेनुसार आधुनिक सॉफ्टवेअर, ट्रेनिंग शिकणे गरजेचे आहे असे सांगितले.
 प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व व्यक्तित्व विकास होण्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम घेतले जातात याबद्दल माहिती दिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, रत्नागिरी, मुंबई, बेळगाव, हुबळी येथून 800 पेक्षा जास्त विद्यार्थी इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. 
 या इव्हेंट मध्ये डी वाय पाटील कॉलेज कसबा बावडा, केआयटी, डीकेटीई इचलकरंजी कॉलेजसह अन्य कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले. विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी, सर्टिफिकेट देवून गौरविण्यात आले.
या इव्हेंटचे संयोजन स्टूडेंट डीन प्रा. गौरव देसाई, डीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. अमर पाटील यांनी केले.कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. अनिलकुमार गुप्ता, विश्वस्त माननीय तेजस पाटील, माननीय आ. ऋतुराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष  सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.