+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Mar 24 person by visibility 157 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने, १५ मार्च २०२४ रोजी शिक्षकांचा पेहराव व ड्रेसकोड बाबत आदेश दिले आहेत. शिक्षकांनी या आदेशाला विरोध केला आहे. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी,  २८ मार्च रोजी सर्व शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व मनपा प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने केले आहे.
 शिक्षक शाळेत जाताना योग्य समाजमान्य पेहराव करूनच शाळेत जातात असे असताना ड्रेस कोड च्या नावा खाली शिक्षकांना पेहरावा बाबत बंधने घालणे हे काळाला धरून नाही. यापूर्वी शासने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता व तो निर्णय हाणून पाडला आहे. तरी येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने भरत रसाळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने यांनी केले आहे.