+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Apr 24 person by visibility 74 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  ‘दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची मयत सभासद योजनाही संबंधित कुटुंबिंयासाठी अमृत संजीवनी ठरली आहे.’असे भावोत्कट उद्गगार मयत सभासदांच्या वारसदारांनी काढले. 
  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने नुकतीच "अमृत संजीवनी" या नावाने बिगर कर्जदार व कर्जदार सभासदांसाठी योजना आणली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर जे सभासद दुर्दैवाने मयत झाले अशा सभासदांचे वारसांना या योजनेअंतर्गत मदत निधीचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम नुकताच शिक्षक बँकेत  झाला. यावेळी बिगर कर्जदार सभासद के. सुभाप शिवाजी खोत (शिरोळ) यांच्या पत्नी श्रीमती पूनम खोत तसेच कै. शंकर शामराव पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 एखाद्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या कुटुंबाचे जे आर्थिक व सामाजिक नुकसान होते. त्या वेदना त्या कुटुंबालाच माहीत असतात. आज बँकेची "अमृत संजीवनी" कर्ज माफी योजना आमच्या कुटुंबाला या कुटुंबातून सावरण्यासाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरली आहे. आम्ही बँकेचे शतशः ऋणी आहोत.' अशा भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. यावेळी कै. सुभाष शिवाजी खोत (शिरोळ), कै. शंकर शामराव पाटील (राधानगरी), कै. प्रताप विलास लोहार (पन्हाळा), कै. उज्वला श्रीकृष्ण मुरुडकर (शिरोळ), व कै. मंगल भगवान चौगुले (करवीर) यांच्या वारसांना मदतीच्या धनादेशाचे वितरण केले.
 बँकेचे चेअरमन राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.  सुनील पाटील यांनी मयत सभासदाबद्दल संवेदना व्यक्त करून' या योजनेत सहभागी झाल्यामुळे बँकेला आपल्या दुःखात सहभागी होता आले' अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी व्हाईस चेअरमन अमर वरुटे, संचालक अर्जुन पाटील, सुनिल एडके, शिवाजी बोलके, एस.व्ही पाटील, बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी रोडे- पाटील, बाळकृष्ण हळदकर, बाबू परीट, नंदकुमार वाईगडे, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, वर्षा केनवडे, सतिश तेली, तानाजी घरपणकर, सभासद तानाजी मेढे, शरद केनवडे तसेच बँकेचे सीईओ संजयकुमार मगदूम उपस्थित होते. संचालिका पद्मजा मेढे यांनी आभार मानले.