+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Apr 24 person by visibility 129 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक बँकेने सुरू केलेली अमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  विरोधी आघाडीच्या शिक्षक नेत्यांनी या योजनेवरुन सत्ताधाऱ्यावर आक्षेप नोंदविले असताना दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक निळकंठ ख्रे यांनी या योजनेसंबंधी तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना बँक प्रशासनाला केली आहे. 
  दरम्यान ‘मयत सभासदांसाठी, सभासदांनी स्विकारलेली जुनी मयत सभासद कल्याण निधी योजना बंद करून विद्यमान संचालक मंडळाने रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय सुरू केलेल्या अमृत संजीवनी योजने बाबत अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी शिक्षक बँकेस नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सदर योजना वादाच्या भोव-यात सापडली आहे.’असा हल्लाबोल महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला आहे. 
 बँकेचे माजी संचालक तथा पुरोगामीचे राज्याध्यक्ष पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये योजनेस रिझर्व्ह बँकेची परवानगी नसताना सभासदांच्या संमतीशिवाय वर्गणी कायम ठेवीतून प्रत्येकी ५० हजार रूपये परस्पर वर्ग करण्याचा केलेला व्यवहार पूर्णतः बेकायदेशीर असून, त्यामुळे सहकार कायदा व रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याने बेकायदेशीर व्यवहार करणा-या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. विद्यमान संचालक मंडळाने मनमानी कारभार ३१ डिसेंबर रोजी सुमारे ६ हजार सभासदांचे सुमारे ३० कोटी रूपये, इतकी मोठी रक्कम वर्ग केल्याने बँकेचे भांडवलही कमी करून संस्था आर्थिक अडचणीत आणण्याचा गंभीर प्रयत्न विद्यमान संचालक मंडळाकडून झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  मनमानी व बेकायदेशीर व्यवहार करून बँकेचे व सभासदांचे हीत धोक्यात आणणा-या विद्यमान संचालक मंडळास संचालक पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने सभाहद हितासाठी व संस्थेच्या हितासाठी सदरचे संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे केली होती.
   ...................................................
    दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मयत सभासदांच्या वारसांना वितरण केलेल्या चेकची प्रसिद्धी करणे ही बाब खेदजनक आहे. आणि मुळात परवा मयत सभासदांच्या वारसांना वितरण केलेले मदतीचेक्षचेक हे जुन्या योजनेतील असून सुध्दा त्यास नवीन योजनेचा लाभ म्हणून खोटी प्रसिद्धी कशासाठी ? 
-प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना