+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे adjustजनतेशी विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा- सतेज पाटील adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !!
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Apr 24 person by visibility 83 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोळा ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत सामाजिक वंचित घटक (एससी,एसटी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी,ओबीसी, एसबीसी ) / आर्थिक दुर्बल घटक / घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ / दिव्यांग / एच.आय.व्ही. किंवा कोविड प्रभावित बालके आदी घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी RTE पोर्टलवर नमूद कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन  शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे.
 कालावधीनंतर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील सुधारित अधिसूचना ९ फेब्रुवारी २०२४ नुसार बालकाच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अल्पसंख्यांक शाळा वगळता अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के पर्यंतच्या जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकांतील बालकांना प्रवेश देण्यासाठी पात्र असतील, अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविण्यात येईल.