+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहापालिकेतील तीन बडया अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस ! प्रशासकाकडून कारवाई !! adjustटेनिस स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का adjustविश्‍वराज महाडिकांच्या विवाहनिमित्त शाही स्वागत सोहळा adjustराज्य निवड महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड adjustमहावितरणच्या जनमित्रांना सुरक्षेचे धडे adjustएटी स्पोर्ट्स ठरला लिंगायत प्रीमिअर लीग विजेता adjustशहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सवर दंडात्मक कारवाई ! जैव वैद्यकीय कचऱ्याप्रश्नी महापालिकेचा डोस !! adjust तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन ! तुर्कीतील परिषदेत करणार संबोधन adjust विद्यापीठात कलर अवार्ड उत्साहात, न्यू कॉलेजला नागेशकर ट्रॉफी ! adjustकोल्हापुरात रंगला ४३४ मुलांचा जन्मोत्सव, पत्की हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 213 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत मानवी रांगोळीसह अन्य उपक्रमाचे आयोजन केेले होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा येथे कार्यक्रम झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहकारी संस्थेचे जिल्हा उप निबंधक निलकंठ करे, शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे उपस्थित होते.
सत्कार प्राप्त शाळा मुख्याध्यापक पुढीलप्रमाणे : दादासाहेब अ.मगदूम हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, आर्यव्रीन ख्रिश्चन हायस्कूल, जवाहरनगर हायस्कूल, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, कोल्हापूर हायस्कूल, मलग हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, मनपा नेहरूनगर विद्यालय, मनपा संत रोहिदास विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्यामंदिर, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, न्यू हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमातीदेवी हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, राजर्षी शाहू महाराज मिडीयम स्कूल, नूतन मराठी विद्यालय हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, नूतन मराठी ब्रँच क्र. एक श्री साई हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल, रंकाळा, सेंट झेविअर्स हायस्कूल, चाटे माध्यमिक स्कूल, कोल्हापूर पब्लिक स्कूल, जिनरत्नेय पब्लिक स्कूल, संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल, कदमवाडी हायस्कूल जुना बुधवार, सौ स.म.लोहिया हायस्कूल, शाहू दयानंद हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल.
सत्कार प्राप्त अधिकारी व शिक्षक पुढीलप्रमाणे : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर, शिक्षण समिती प्रशासनाधिकारी शंकर केशव यादव, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, शारिरीक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक  राजेंद्र बनसोडे,  सदाशिव राठवळ,  विनायक भिउंगडे. कलाशिक्षक नागेश हंकारे, शैलेश कांबळे, रावसाहेब शिंदे,  शीतल होगाडे, रमजान मुल्ला, जितेंद्र कुबडे, विश्वास माळी,  मानसिंग पाटील, संजय वाडकर, रितेश माने, किशोर पाटील, अनिल अहिरे, रमण लोहार, दिगबर गवळी, पद्माकर कुलकर्णी, सहायक शिक्षक  गजानन धुमाळे, व्ही.आर. खराटे, प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब गणपती किर्तीकर, सहायक शिक्षिका शितल विवेकानंद हिरेमठ यांचा समावेश आहे.
 कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या वरिष्ठ लेखा परीक्षक  वर्षा परीट, सहायक निबंधक सुनील धायगुडे, मिलिंद ओतारी, नितीन माने, उदय उलपे आदींनी केले.  उपस्थित सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी ‘वोट फॉर कोल्हापूर’ची घोषवाक्य उच्चारुन कार्यक्रमाची सांगता झाली. स.म.लोहिया हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.