+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 112 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ’गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ या सुत्रानुसार निवडून आलेल्या खासदार संजय मंडलिकांनी पाच वर्षात मतदारांशी प्रतारणा केली. मतदारसंघाशी संपर्क नाही.विकासकामांचा पत्ता नाही. व्यक्तीगत स्वार्थ साधणाऱ्या जनतेला फसवणाऱ्या गद्दारी आणि विश्वासघात करणाऱ्या मंडलिकांना यंदाच्या निवडणुकीत पराभूत करा आणि समतेचा विचार दिल्लीत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना निवडून द्या. ’असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केल.
 महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ साई मंदिर, कळंबा येथे जाहीर सभा झाली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली.
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील म्हणाले, ‘भाजपा सरकारचा कारभार हा शेतकरी, तरुण आणि महिला विरोधी आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी ठरविण्याचे कारस्थान भाजपाने केले. शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही, पण भाजपाने उद्योगपतींची कर्जमाफी दिली. बडया भांडवलदारासाठी काम करणारे हे सरकार परत निवडून आले तर शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामावर फुललेला गोकुळ दूध संघालाही अडचणीत आणू शकेल. अमूलच्या फायद्यासाठी ही मंडळी गोकुळची अवस्था महानंदसाखी करतील. 
 उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, ‘देशात सध्या अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. तेव्हा समस्त देशवासियांनी एकत्र येऊन लोकशाही बळकट करायला हवी. संविधान जपायला हवं. महाविकास आघाडीने जनहिताच्या कामाचा अजेंडा जाहीर केला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करू.’
याप्रसंगी कॉम्रेड दिलीप पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, समाजवादी पक्षाचे रविकुमार जाधव, लाल निशाण पक्षाचे प्रकाश जाधव यांची भाषणे झाली. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, शारंगधर देशमुख, प्रतिक्षा पाटील, कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, कॉम्रेड सतीश कांबळे, अर्बन बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, धीरज पाटील, आपचे उत्तम पाटील, अमर सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, सुरेश देशमुख, माजी सरपंच सागर भोगम, अमर रामाणे आदी उपस्थित होते.
........................
छत्रपतींचा अवमान कोल्हापूरकर सहन करणार नाहीत
शिवसेनेचे हर्षल सुर्वे म्हणाले, ‘महायुतीच्या उमेदवारांकडून शाहू छत्रपती यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. मात्र कोल्हापूरची जनता शाहू छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही. मंडलिकांनी जपून बोलावे, अन्यथा गाठ कोल्हापूरशी आहे. महायुतीचे उमेदवार प्रचाराला आले की सिलिंडरची टाकी त्यांच्यासमोर ठेवा आणि दहा वर्षातील महागाईविषयी विचारणा करा.”
……………
महाविकास आघाडीची ताकत वाढली, महायुती भुईसपाट
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, ‘भाजप सरकारची राजवट म्हणजे हुकूमशाहीचे सावट आहे. जनतेला खोटी आश्वासने देत दहा वर्षे झुलवित ठेवले. भाजपाचा खरा चेहरा लोकांना कळला आहे. संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे. महायुती या निवडणुकीत भुईसपाट होईल. कोल्हापुरातून शाहू छत्रपती हे उच्चांकी मतांनी निवडून येतील.’