+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 201 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  
वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे झाले.  यामध्ये ३२५ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 
शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळेसो यांच्या हस्ते करण्यात आले.चेअरमन डोंगळे म्हणाले, सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. अशावेळी गोकुळ कर्मचारी संघटनेने “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले या बद्दल कर्मचारी संघटनेचे कौतुक केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना सुरक्षतेसाठी संघटनेकडून कडून आय,एस,आय,मार्क हेल्मेट देण्यात आले. 
यावेळी आयटक कामगार संलग्न गोकुळ कर्मचारी,मार्व्हलस कंपनी,टूलेक्स कंपनी, लक्ष्मी लाडा कंपनीचे कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. गोकुळचे  संचालक विश्वास पाटील यांनी रक्तदान शिबिरस्थळी भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी संघाचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम,अध्यक्ष मल्हार पाटील, कॉ व्ही डी पाटील, कॉ लक्ष्मण पाटील, कॉ दत्ता बच्चे, कॉ संभाजी शेलार, तसेच श्री नामदेव कळत्रे यांनी परिश्रम घेतले. व्यवस्थापक प्रतिनिधी म्हणून डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील यांचे सहकार्य लाभले