+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustटेनिस स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का adjustविश्‍वराज महाडिकांच्या विवाहनिमित्त शाही स्वागत सोहळा adjustराज्य निवड महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड adjustमहावितरणच्या जनमित्रांना सुरक्षेचे धडे adjustएटी स्पोर्ट्स ठरला लिंगायत प्रीमिअर लीग विजेता adjustशहरातील पाच मोठया हॉस्पिटल्सवर दंडात्मक कारवाई ! जैव वैद्यकीय कचऱ्याप्रश्नी महापालिकेचा डोस !! adjust तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचे नामांकन ! तुर्कीतील परिषदेत करणार संबोधन adjust विद्यापीठात कलर अवार्ड उत्साहात, न्यू कॉलेजला नागेशकर ट्रॉफी ! adjustकोल्हापुरात रंगला ४३४ मुलांचा जन्मोत्सव, पत्की हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमाचे आयोजन adjustमहात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात केल्यास आयुष्यात बदल
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 138 categoryजिल्हा परिषद
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेले गोकुळचे संचालक व यूथ बँकेचे अध्यक्ष चेतन नरके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष आणि नरके गट एकत्र आल्यामुळे शाहू छत्रपतींच्या विजयाचा पाया करवीर तालुक्यात रचला जाईल.’’ असेही नरके यांनी सांगितले. करवीर तालुक्यातील वाकरे फाटा येथील श्री विठाई चंद्राई लॉन येथे नरके गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, करवीर मतदारसंघातील आमदार पी.एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
चेतन नरके म्हणाले, ‘ लोकसभेच्या रिंगणातून माघार घेऊन नरके यानी काय मिळवले ? अशी चर्चा काही जण करत आहेत. अडीच वर्षात जे मी मिळवले आहे, ते आता माझ्यासोबत आहे. यामुळे त्यांनी आमची काळजी करू नये तर स्वत:ची माणसे आणि गट सांभाळावीत. पन्हाळा, करवीर तालुक्यातील नरके गटाच्या कार्यकर्त्याला कोणतीही अडचण असू दया, मला संपर्क साधा, तुमच्यासाठी २४ तास दरवाजे खुले आहेत. सत्तेच्या ताकतीवर कोणी आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे गाठ चेतन नरकेंशी आहे. आता सतेज पाटील सोबत आहेत. कोणी माझ्या आडवे पाय मारण्याचा प्रयत्न केला तर तर मलाही आता कुंभीसहित इतर राजकारणावर बोलावे लागेल.’अशा शब्दांती त्यांनी तराटणी दिली.
याप्रसंगी उमेश नरके, युवराज काटकर, रणजित पाटील, प्रकाश मोरे, संतोष शेळके, शिवसेनेचे सुहास पाटील यांची भाषणे झाली.चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. मेळाव्याला सत्यशील संदीप नरके, बाजार समिती सभापती भारत पाटील भुयेकर, यूथ बँक संचालक विश्वास पाटील, आनंदा बेलेकर, दगडू टोपकर, संजय मोरे, रंगराव मोळे, एस. के पाटील, अशोक पाटील, पैलवान संभाजी पाटील, चंद्रकांत जाधव, तेजस मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.
………………
आमचं ठरलंय, शाहू महाराज की जय !
 ‘लोकसभा निवडणुकीत महाराज निवडून येणार आहेत. आमचं ठरलंय, शाहू महाराज की जय ! त्यांचे मताधिक्य एक लाख, दोन लाख की त्याहून जास्त. हा भाग वेगळा. मात्र निकालानंतर त्यांचे दर्शन घेणारा मी पहिला असेन.’असे अरुण नरके यांनी भाषणात स्पष्ट केले. नरके यांच्या या घोषणेनंतर पन्हाळा, करवीर गगनबावडा तालुक्यासह अन्य ठिकाणच्या नरके गटाच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी उभे राहून हात उंचावत घोषणेला पाठिंबा दिला.