+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे adjust बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार adjustग्रामसेवकांच्या विरोधात सीईओंच्याकडे तक्रारी adjustकेआयटी रेडी इंजिनियरमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल adjustप्रा.ऋतुराज कुळदीप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन adjustख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मनोरंजननगरी, माशांच्या नानाविध जाती ! adjustडीवाय पाटील फार्मसीत जी पॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन adjustआचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक ! शिक्षक संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट adjustजिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली ! फायलींचा प्रवास-दिरंगाई समोर येणार !!
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 139 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
: जिल्ह्यात सार्वजनिक व वैयक्तिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात यात्रा, जत्रा, माही, निवासी शाळेतील जेवण व पारायण सप्ताह अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना शक्य असल्यास दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करु नये अथवा समावेश केल्यास ते चांगले व ताजे असल्याची खात्री करुनच द्यावे.  तसेच पिण्यासाठी अथवा जेवणासाठी वापरात येणारे पाणी हे शुध्दीकरण केले असल्याची खात्री करुनच घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये सार्वजनिक व वैयक्तिक स्वरुपात मोठ्या प्रमाणात यात्रा, जत्रा, माही, निवासी शाळेतील जेवण व पारायण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन एप्रिल व मे महिन्यामध्ये केले जाते. या कार्यक्रमांना नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे नागरिकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. कुरुंदवाड येथील सैनिक पॅटर्न निवासी शाळेतील जेवणामुळे मुलांना अन्न विषबाधा झाली आहे. त्याचप्रमाणे करवीर तालुक्यातील परिते  येथे पारायण सप्ताहातील जेवणामुळे अन्न विषबाधा झाली होती. तसेच गडहिंग्लज येथील हनुमान जयंती निमित्त महागाव गावातील उत्सवावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दुसऱ्या दिवशी नागरिकांना उलट्या व अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यानंतर आरोग्य विभागामार्फत महाप्रसाद घेतलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा देऊन तात्काळ उपचार देऊन बरे झाले. या महाप्रसादावेळी नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थापासुन बनवलेल्या खिरीचे सेवन केले होते असे दिसुन आले.
सध्या हवामान विभागामार्फत उन्हाळ्याचे प्रमाण वाढ होत असल्याचे कळविण्यात आले आहे. या हवामान बदलामुळे दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होण्याचे प्रमाण जास्त असते व मोठ्या प्रमाणात केलेल्या महाप्रसादामध्ये पदार्थांची विशेष काळजी हव्या त्या प्रमाणात घेतली जाईलच असे सांगता येणे शक्य नाही. अशा पदार्थांचे वाटप करताना विशेष काळजी घेतली नसल्यामुळे अन्न विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते व तसे निदर्शनास येत असल्याचेही आरोग्य विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.