+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Mar 24 person by visibility 146 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोरोना काळात खरेदी केलेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. वैद्यकीय साहित्य अव्वाच्या सव्वा दराने घेतल्याचे प्रकारही घडले होती. लोकप्रतिनिधींनीही या प्रकाराविरोधात आवाज उठवला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेतही या कालावधीत कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी झाली होती. या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या सरकारी कमिटीने स्पेशल ऑडिट सुरू केले आहे.
दोन सदस्यीय कमिटी, गुरुवारी (१४ मार्च) कोल्हापुरात दाखल झाली. त्यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. स्टोअर विभागाला भेट दिली. कागदपत्रांच्या तपासणीला सुरुवात केली. कोरोना कालावधीत मास्क, कीट व अन्य वैद्यकीय साहित्याची मोठी खरेदी केली आहे. आपत्तकालीन व्यवस्थापन अंतर्गत लाखो आणि कोट्यवधी रुपयांच्या किमतीची साहित्य खरेदी विना टेंडर पार पडली होती. कोट्यवधी रुपयांचा खरेदी होती.मात्र वैद्यकीय साहित्य खरेदी प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी काही अधिकाऱ्यांच्या कामाचा पंचनामा केला. जवळपास ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही झाला. राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या वैद्यकीय साहित्य खरेदीतही मोठया प्रमाणात घोटाळयाचा आरोप झाला आहे. राज्य सरकारने या साऱ्या प्रकरणाची स्पेशल ऑडिट करण्याचे ठरविले. त्यानुसार दोन सदस्यीय कमिटी कोल्हापुरात दाखल झाली. आणखी काही दिवस ते कोल्हापुरात थांबून साहित्य खरेदी प्रकरणाची तपासणी करणार आहेत.
…………………………………………………