+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule07 Sep 24 person by visibility 367 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठातील डॉ. सागर दा. डेळेकर (रसायनशास्त्र अधिविभाग), डॉ. प्रमोद अ. कोयले (स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी), प्रा. विजय घोडके (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी), प्रा. प्रकाश पवार (यशवंतराव पाटील सायन्स महाविद्यालय सोळांकूर), डॉ. प्रशांत पाटील (तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ) व डॉ. सतीश पाटील (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) यांनी नॅनो संमिश्रे आधारित सौर उपकरण, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणे तसेच वायू पदार्थ संवेदन (गॅस-सेन्सर) याविषयी सखोल संशोधन केले असून संशोधनासाठी त्यांना २ जर्मन व १ युके पेटंट प्राप्त झाले आहे.
डॉ. डेळेकर यांनी सांगितले की, ‘संशोधक चमू सौर ऊर्जेच्या रूपांतरणासाठी धातू ऑक्साईड-आधारित नॅनोसंमिश्रे विकसित करण्यासाठी संशोधन करीत आहे. तसेच, दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी आदी सूक्ष्म जीवजंतू सर्वत्र आढळतात, जे वातावरणात दुर्गंधी व अस्वच्छता पसरण्याचा कारणीभूत ठरतात. असे सूक्ष्म जीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करून अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता खूप असते. किंबहुना मधुमेही, बीपी रुग्णांना अशा जीवजंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते.
म्हणून या सूक्ष्म जीवजंतूचा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्यासाठी प्रा. डेळेकर व त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रा. व्ही. एस. घोडके यांनी धातू ऑक्साईड नॅनोसंमिश्रे-आधारित प्रतिजैविक घटक बनविले आहेत. ज्याचा उपयोग निश्चित: जीवाणूजन्य संसर्ग व संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. एकंदरीत धातू ऑक्साईड-आधारित नॅनोसंमिश्रे वापरून फक्त ऊर्जा संबंधित नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातही प्रभावीपणे विकास केला जाऊ शकतो, जे पर्यावरणीय तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून समाजासाठी उपयुक्त आहे.
आजपर्यंत डॉ. डेळेकर यांनी १०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांचे १२ पेटंट मान्य झाले आहेत. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ. डेळेकर यांच्यासह सर्वच संशोधकांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.