Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरचे विमानतळ जगाच्या नकाशावर नेणारा खासदार सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव शुक्रवारपासून, तीन दिवस सांगितीक मेजवानीएसटीच्या जागेवर प्रत्येक जिल्हयात रुग्णालय, कोल्हापूर, पुण्यातील रुग्णालयासंबंधी सादरीकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंदसुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदानश्री.आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रमआंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संवाद, तरुण खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप ! कोल्हापूर बॅडमिंटनचा सुवर्णसोहळा !!व्यापारी-उद्योजकांमध्ये शुक्रवारपासून रंगणार क्रिकेट सामनेकेडीसीसी बँकेच्या २५ अधिकाऱ्यांना व्यवस्थापक-उपव्यवस्थापकपदी बढत्या न्यू कॉलेजमध्ये सतरा जानेवारीला राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

जाहिरात

 

कागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो

schedule15 Sep 24 person by visibility 453 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " धनंजय महाडिक युवाशक्तीचे नेटवर्क संपून जिल्हाभर आहे. कागल विधानसभा मतदारसंघात युवाशक्तीचे 15 ते 20 हजामात्र कागलच्या नेते मंडळीकडून कायमच युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाते. पालकमंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांना मान देत नाहीत कोणत्याही समारंभाला बोलवत नाहीत. विकासकामांना निधी देत नाहीत. बदलत्या राजकीय स्थितीत कार्यकर्त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा  धर्म पाळतो" अशा परखड भावना कागल- गडहिंग्लज -उतूर विधानसभा मतदारसंघातील धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या. 
कागल विधानसभा मतदारसंघातील धनंजय महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते रविवारी सायंकाळी कावळा नाका परिसरातील खासदार महाडिक यांच्या कार्यालयात पोहोचले. मतदार संघातील युवाशक्तीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडायचे आहेत असे सांगत गेल्या 20 वर्षातील अनुभव कथन केले. कार्यकर्त्यांच्या या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, युवाशक्तीचे शिरोळ तालुका प्रमुख ज्योतीराम जाधव उपस्थित होते. 
 "2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी असताना त्यांचा पराभव झाला. कागलमध्ये कोणाला किती मतदान झाले कोणी दगाफटका केला हे सगळ्यांना माहित आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंग घाटगे यांच्याकडून युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जात नाही. तुम्ही बोलते व्हा, कोणाला किती नाचवायचं, कोठे ठेवायचे हे आम्हाला माहित आहे " अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावना खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर व्यक्त केल्या. युवाशक्तीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर रोष व्यक्त केला.
 आम्ही ना महायुतीवाले , ना महाविकास आघाडीवाले, ना काँग्रेसवाले, ना राष्ट्रवादीवाले, ना भाजपवाले ना शिवसेनावाले, आम्ही फक्त महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते आहोत. अशी रोखठोक मते ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गडहिंग्लज तालुकाप्रमुख बाळ पोटे पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांच्यासोबत आपण गेली 25 वर्षे आहोत एखाद्या नेत्यासोबत इतका  काळ एकनिष्ठ असणे यातूनच नेत्याची आणि कार्यकर्त्यांची विश्वसनीयता स्पष्ट होते. युवाशक्तीचे नेटवर्क मोठे आहे. युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीत इतर नेत्यांना मदत केली मात्र त्यांचा मानसन्मान राखण्याऐवजी त्यांना गृहीत धरले जाते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे निवडून आल्यानंतर त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघासाठी आठ कोटीचा निधी दिला. पण त्या आठ कोटीच्या विकास कामाच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांनी,  खासदार महाडिक यांनाही आमंत्रित केले नाही आणि युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी बोलावले नाही. 
विधानसभा निवडणुकीत तर युवाशक्तीची पाच हजाराची फौज राष्ट्रवादीच्या नेते सोबत होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विजयात युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा वाटा मोठा आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी किंगमेकर ठरवले सतेज पाटील आणि उमेश आपटे यांना. खरे तर किंग मेकर धनंजय महाडिक आहेत. त्यांचा असला प्रकार आम्ही का सहन करायचा ? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी असताना देखील त्यांचा पराभव झाला. कागलमध्ये राजकारण काय झाले, कोणी दगाफटका केला, तुमचा पराभव कसा झाला हे जनतेला माहित आहे. गेल्या निवडणुकीनंतर समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने तगडा पर्याय दिला. त्यांना आम्ही मतदारसंघात पोहचविले. पण त्यांचा अनुभव ही चांगला नाही.
 नव्या राजकीय समीकरणामुळे तर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याचे राजकारण हातात घेण्याची वेळ आली आहे त्यांनी भावनिक होऊ नये. जिल्हा परिषद नगरपालिका, महानगरपालिका, गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक बाजार समिती अशा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. गोकुळात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता लोकांना उलटा अनुभव येत आहे. गोकुळ मध्ये महाडिकांचीच सत्ता चांगली होती, गोकुळ चालवावा तो महाडिक यांनीच अशा प्रतिक्रिया आता दूध उत्पादन सभासदातून उमटत आहेत. "
 शिवाजी मगदूम म्हणाले, युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा इतर नेते मंडळी कडून फक्त वापर होतो. निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अन्याय केला जातो. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा पराभव कसा झाला हे सगळे कार्यकर्त्यांच्या लक्षात आहे. आता खासदार म्हणून धनंजय महाडिक यांनी कोट्यवधीचा निधी आणला. पूर्वी खासदार असतानाही निधी दिला. निधी महाडिकांचा, उद्घाटन करत आहेत मुश्रीफ आणि घाटगे.
 याप्रसंगी आदरा तालुका अध्यक्ष समीर चॉंद यांनी नगरपालिका निवडणुकीत इतर नेते मंडळीकडून कशी फसवणूक झाली याचा पाढा वाचला. महाडिक यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून प्रत्येक वेळी डावलले जाते असा आरोपही त्यांनी केला. याप्रसंगी सागर गंधवाले, सागर देसाई, विजय फुटाणे यांची भाषणे झाली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी सगळ्यांनी एक दिलाने काम करायचे आहे. कोणी कुठलाही दुसरा विचार करायचा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्य तत्पर आहेत. राज्याला विकासाची दिशा देत आहेत. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी सगळ्यांनी तयार राहावे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes