+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 537 categoryउद्योग
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जवळपास तीन वर्षाची प्रतिक्षा, सरकारकडे सातत्याने पाठपुरावा, ते प्रयत्न फलद्रूप ठरले आणि सोळा सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटाला वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून पुण्याकडे मार्गस्थ झाली. याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसने अनोखा हर्षोल्हास अनुभवला. कोल्हापूकरांचा ओसांडणारा उत्साह, आनंद आणि स्वप्नपूर्तींनी भारावलेली मनं आणि स्वप्नांना लाभलेली गती असे सुखद चित्र साकारले. एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. मेट्रो शहरात धावणारी एक्सप्रेस कोल्हापुरातून सुरू झाल्याचा अनोखा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटला होता. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी स्टेशनवर गर्दी केली होती.
करवीरकर नागरिक, प्रवाशांनी कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासाठी अगदी दुपारपासून रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उद्घाटनच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. आणि साऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या स्क्रीनवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. तत्पूर्वी कोल्हापूर रेल्वेस्टेशनवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात हजर होते.
कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी हा सारा प्रसंगी अभिमानास्पद होता. या समारंभातच महाडिक यांनी, रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्याकडे लवकरात लवकर कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी आणि एक्सप्रेसचे तिकीट दर कमी करावेत अशी आग्रही मागणी केली. उद्घाटनचा कार्यक्रम संपताच साऱ्यांच्या नजरा खिळल्या त्या वंदे भारत एक्सप्रेसकडे.
 पूर्णता भारतीय बनावटीची. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज, वातानुकूलित आणि आकर्षक पद्धतीची बांधणी यामुळे एक्सप्रेसवरुन नजर हटत नव्हती. हाराफुलांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी सजलेली एक्सप्रेस साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. चार वाजण्याअगोदर सगळे डब्बे प्रवाशांनी फुल्ल भरले होते. चार वाजून वीस मिनिटाला एक्सप्रेसला प्रारंभ होताच सारे स्टेशन ‘शाहू महाराज की जय, वंदे मातरम’ या घोषणांनी दुमदुमला. पारंपरिक वाद्यांच्या गजरांनी कार्यक्रमात रंग भरला होता. रेल्वे स्टेशनवर जमलेल्या हजारो लोकांनी हात उंचावत एक्सप्रेसच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला उभारलेल्या नागरिकांच्या डोळयात या नव्या रेल्वेचे कुतूहूल जाणवत होते.
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी अनुभूती होती. प्रसन्न वातावरण, आरामदायी आसन व्यवस्था, गारवा निर्माण करणारी वातानुकूलित यंत्रणा, आणि सुखदायी प्रवास प्रत्येकाच्या मनाला सुखावत होता. स्टेशनमधून बाहेर पडताच एक्सप्रेसने वेग पकडला. काही मिनिटातच ताशी शंभरच्या गतीने रेल्वे धावू लागली. ना कुठे थांबा, ना गतीला ब्रेक….एक्सप्रेस सुसाटपणे मिरजकडे धावू लागली. गांधीनगर, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर थांबे मागे सारत एक्सप्रेसने मिरजच्या हद्दीत प्रवेश केल्याचे ध्वनीयंत्रणेवरुन समजले. शुभारंभाच्या निमित्ताने रेल्वे व्यवस्थापनने सगळया प्रवाशी वर्गासाठी चहापान व नाष्टयाची सोय केल्याने हा प्रवास आणखी रुचकर बनला. एरव्ही एक तास ते एक तास दहा मिनिटाचा कोल्हापूर-मिरजचा हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसमुळे अवघ्या ३५ मिनिटात पूर्ण झाला. चार वाजून ५५ मिनिटाला वंदे भारत एक्सप्रेस मिरज स्थानकांत पोहोचली. पुन्हा स्वागत…पुन्हा कुतूहलभरल्या नजरा…आणि शुभेच्छांचा वर्षाव अशा माहौलमध्ये सांगली…किर्लोस्करवाडी…कराड….सातारा पार करत पुणे ! हा वंदे भारतचा मार्ग. प्रवाशांसाठी संस्मरणीय ठरला. भारत एक्सप्रेसमधून प्रवास करता येणार आहे. आठवडयातून तीन दिवस कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. प्रत्येक सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी कोल्हापुरातून पुण्याला वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करता येईल.