+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 101 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये इथल्या प्रत्येक नागरिकांमध्ये रुजावीत आणि संविधानाबद्दल पसरविण्यात येणारे गैरसमज दूर व्हावेत या  उद्देशाने सहा ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापुरात "संविधान परिषद" पार पडणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. 
 क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना  २०२१-२२ अंतर्गत विचारे माळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयासाठी  ५० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी  क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करत आवश्यक सूचना दिल्या. या डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा सहा रोजी पार पडणार आहे.
 क्षीरसागर यांनी, संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. भारत सरकारने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना अभिवादन म्हणून २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. आता दरवर्षी संविधान दिन साजरा होतो. तसेच  प्रजासात्ताक दिनालाही २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हा एक भारतीय लोकशाहीला दुग्धशर्करा आणि सुवर्ण योग आहे. यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर भूमी कोल्हापुरात सहा ऑक्टोबर २०२४ रोजी विचारे माळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालय येथे संविधान आणि लोकशाहीचा महाउत्सव "संविधान परिषद" करण्यात आली आहे. याकरिता सुमारे २५ हजार आंबेडकर अनुयायी आणि बहुजन समाजाचे नागरिक उपस्थित राहणार असल्याचे माहिती दिली.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, हर्षजीत घाटगे, उपशहरअभियंता रमेश कांबळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, मंथन फाउंडेशनचे मारुती माने,  डॉ.प्रवीण कोडोलीकर,   माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर, रावसाहेब वसगडेकर, अजिंक्य शिंदे, विराज सुतार आदी उपस्थित होते.