+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 54 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘लेटेस्ट रामराज्य’ हा सोहळा पाहता येणार आहे. शिवाय पुष्पक विमानाचा (गरुड वाहन) चित्ररथ हे मिरवणुकीचे आकर्षण ठरेल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव यांनी दिली.
गणेश विसर्जन मिरवणुकीत शंभर गुढया अग्रभागी असतील. १२० जणांचे झांज पथक, धनगरी ढोल आणि पारंपरिक वेशभूषेतील ३५० हून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मिरवणुकीतील वैशिष्टयाविषयी बोलताना अध्यक्ष यादव म्हणाले, ‘मंडळातर्फे यंदा, वनवास संपवून श्रीराम, सीता व लक्ष्मण हे पुष्पक विमानातून अयोध्यानगरीत येत आहेत या संकल्पनेवर मिरवणूक आहे. पुष्पक विमान अर्थात गरुड वाहन हे चित्ररथ १२ फूट रुंद आणि २४ फूट लांबीचे आहे.
 मंगळवारी सकाळी दहा वाजता चित्ररथाचे उद्घाटन आहे. युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल. यावेळी मूर्तीशास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर, उमाकांत राणिंगा, माजी नगरसेवक राजू लाटकर उपस्थित राहणार आहेत. चित्ररथ निर्मितीसाठी मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, ललित चिकसकर, ओंकार चिकसकर, बाळकृष्ण रानमाळे, भाऊसाहेब ढाले, सलीम पटेल, संतोष हिरलोस्कर, प्रशांत जाधव, अशोक कानकेकर, संतोष देसाई आदींचे सहकार्य लाभले.
पत्रकार परिषदेला मंडळाचे कार्याध्यक्ष संजय दौलत पाटील, अजित पोवार, प्रवीण फडतरे, अविनाश शिंदे, शिवाजी दळवी, संजय चव्हाण, सागर भांडवले, महेश कदम, पंडित पाटील आदी उपस्थित होते.