+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule15 Sep 24 person by visibility 1509 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक बोर्डिंग स्थापन केली, तो उद्देश या संस्थेतील शाखांत सफल होताना प्रकर्षाने दिसतोय आणि व्यावसायिक शिक्षणाच्या अधिक संधी ही संस्था उपलब्ध करत आहे याबद्दल विशेष आनंद होतोय. संस्थेचा विद्यार्थी म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एनआयटीमध्ये विद्यार्थी घडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. अद्ययावत तंत्रज्ञानानुरूप अभियांत्रिकी शिक्षण राबवावे.’असे मत युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. 
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थापित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या शाखेतील पदवी अभियांत्रिकी विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे होते. याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ. प्रतापसिंह देसाई, आयएसटीई गोवा व महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष डाॅ. रणजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती..
 संस्थेच्या कोणत्याही कार्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही आमदार आसगावकर यांनी दिली. 
संस्थेचे विकास अधिकारी तथा एनआयटी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी आपल्या प्रास्ताविकात पदवी विभागाच्या मान्यता प्रक्रियेतील घडामोडी व अडचणी यासोबतच न्यू पाॅलिटेक्निक ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी या बदलाचा प्रवास  विशद केला. 
यावेळी पदवी विभागाच्या उभारणीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी पाटील यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण उपस्थित होते. प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. नितीन पाटील यांनी आभार मानले. प्रा. शामली चव्हाण यांच्या  वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.