ताराबाई पार्कातील डी मार्टवर कारवाई, विक्री व्यवस्था बंद
schedule22 Jul 24 person by visibility 25853 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ताराबाई पार्कातील डी मार्टमधील पदार्थांमध्ये अळया सापडल्याने सोमवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून डी मार्ट मधील विक्री व्यवस्था तात्पुरती बंद केले आहे. डी मार्टमधील ग्राहकांनाही बाहेर काढण्यात आले. लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अळया सापडल्याचा आरोप करून याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील यांनी केली. सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. साायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास डी मार्टवर कारवाई झाली. विक्री बंद करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तैनात केले होते.