+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 259 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे स्टुडंट इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे  उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते झाले. 
प्रथम वर्ष विभागाचे विभाग प्रमुख डॉ.डी.जे. साठे यांनी इंडक्शन कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना सांगितला.संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले .सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यार्थी दशेत घ्यावयाची काळजी तसेच अभियांत्रिकीसाठी भविष्यात असणाऱ्या उज्वल संधी याबाबत मार्गदर्शन केले. 
 शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.अक्षय थोरवत यांनी महाविद्यालयात लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, व्यासपीठांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.डॉ. निवास पाटील व प्रा.श्रुती काशीद यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा. क्षितिजा ताशी यांनी आभार मानले.