+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 99 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : देशाच्या संविधान निर्मितीत डॉ.रत्नाप्पा कुंभार यांचे योगदान मोठे असून ते संविधानाचे खरे उपासक आहेत असे प्रतिपादन  साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले.   येथील डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.                     कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. अमित बाडकर, ॲड. वैभव पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खोत म्हणाले, देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, समाजासाठी खर्च केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर या देशातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च केले. कार्यक्रमाचे दुसरे वक्ते शिवाजी विद्यापीठातील कॉम्प्युटर विभागामधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. कबीर खराडे हे 'कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर भाष्य करताना कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या रोजच्या जीवनातील कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करते , कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यवहारातील उपयोग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आणि गरजा विशद केल्या.अध्यक्षस्थानावरून बोलताना कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या द्वारे स्थापित कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत अशा भावना व्यक्त केल्या. या जयंतीच्या निमित्ताने कॉमर्स कॉलेजच्यावतीने योग शिबिर, रक्तदान शिबिर, मेहंदी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापित केलेल्या लॅग्वेंज लॅबचे उद्घाटन डॉ खराडे यांच्या हस्ते तर तेरा वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष  मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्यावतीने रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, पाककला स्पर्धा, सांजवात, कॉमर्स फोरम, भित्तिपत्रक उद्घाटन, बास्केटबॉल स्पर्धा या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेमधील विजेत्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात निमशिरगाव गावातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या आकाश मळगे, दशरथ नंदीवाले, मानसी कांबळे, आणि निवास खराडे यांचाही सत्कार करण्यात आला.  सत्काराबरोबरच महाविद्यालयातील प्रा डॉ. ताहीर झारी लिखित 'जादुई सोच', 'बीबीए- कोर्स गेट वे ऑफ करिअर एक्सलन्स' आणि डॉ हूगार यांनी कन्नड भाषेत लिहिलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रारंभ महाविद्यालयाच्या आवारातील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्याला संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाल डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे शहाजी लॉ कॉलेजचे प्रभारी. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य बी. डी . कुलकर्णी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एस. देसाई यांनी केले. डॉ. अरुण शिंदे आणि सौ.अश्विनी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.   उप-प्राचार्य डॉ. ए. एस. बन्ने यांनी आभार मानले.