+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Apr 24 person by visibility 353 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रचंड शक्तीप्रदर्शन करत महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. गांधी मैदान ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत प्रचंड पदयात्रा काढली.  उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी माघार घेत माने यांना पाठिंबा जाहीर केला. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाडे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोटारीमधून आमदार आवाडे हे महायुतीचे उमेदवार माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले.
ढोल ताशांचा गजर, हलगीचा कडकडाट आणि जय श्रीराम, जय भवानी -जय शिवाजी अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. महायुतीमधील सहभागी घटक पक्षांचे कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय यांच्यासह घटक पक्ष सहभागी होत एकसंधपणा दर्शवला. हाती भगवे -निळे झेंडे, गळ्यात भगवी मफलर आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत पदयात्रा मार्गस्थ झाली. "मान गादीला - मत मोदीला"या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. मत विकासाला- मत प्रगतीला, अबकी बार ४०० पार अशा घोषणा देत रॅलीचा मार्ग दणाणून सोडला. गांधी मैदान, महाद्वार रोड, पापाची तिकटी अशा प्रमुख मार्गावरून ही रॅली निघाली. रॅलीमध्ये कोल्हापूरसस कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या भागातील नागरिकांचाही सहभाग होता.
 पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, राजेश पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण राजेखान जमादार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी होते.
 दरम्यान महायुतीतील दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी कोल्हापुरात पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई, शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी कोल्हापुरात भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार आवाडे यांना लोकसभा निवडणुकीतून माघार घेत खासदार माने यांना पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आवाडे यांनी उमेदवारी माघार घेत माने यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व आवाडे हे एकाच मोटारीतून महायुतीचे उमेदवार मंडलिक व माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली. या सभेत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येतील असा विश्वास नाही त्यांनी व्यक्त केला.