+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Apr 24 person by visibility 68 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती आज मंगळवारी (१६ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. या शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता असून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या शक्‍तीप्रदर्शनाकडे लक्ष लागून राहिले आहे. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे सहभागी होणार आहेत.  
 दसरा चौकातून सकाळी दहा वाजता शक्‍तीप्रदर्शन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. त्यासाठी मुस्लीम बोर्डिंगजवळ मंडप उभारण्यात आला आहे. जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, डावे पक्ष, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शक्‍तीप्रदर्शनात सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शहरासह कोल्हापूर दक्षिण, करवीर, गगनबावडा, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यातील कार्यकर्ते या शक्‍तीप्रदर्शनासाठी रवाना होणार आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख  सुनील शिंत्रे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, डॉ. नंदिनी बाभुळकर, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, काँग्रेसचे अप्पी पाटील, दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक सत्यजीत जाधव, काँग्रेसचे  शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर शहराध्यक्ष रविकिरण इंगवले व सुनील मोदी, आम आदमी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप देसाई, पिपल्स रिपब्लिकनचे दगडू भास्कर, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी जंगी तयारी केली आहे. शिवसेना युवा सेनेच्यावतीने मोटार सायकल रॅलीही काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याने वाहतुकीची होणारी संभाव्य कोंडी लक्षात घेऊन पार्किंगची ठिकाणे निश्‍चित केली जाणार आहे. तसेच दिशादर्शक फलकही उभारले जाणार आहेत. गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उन्हाचा तडाखा जाणवत आहे. यासाठी जिल्ह्यातून येणार्‍या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय दसरा चौक तसेच मिरवणूक मार्गावर तीस ठिकाणी केली जाणार आहे.