+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule06 Sep 24 person by visibility 99 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शुक्रवारची रात्रीची वेळ, रामानंदगर चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांचा लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान या भागातून जात असताना आमदार सतेज पाटील यांना लोकांची  गर्दी आणि वाहतुकीची कोंडी  दिसली. आमदार पाटील हे चटकन मोटारीतून उतरत चौकात पोहोचले. आणि वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली.आमदार पाटील यांनी दाखवलेली ही तत्परता लोकांना भावली.
 आमदार पाटील हे  स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी जात होते.   रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास  रामानंदनगर चौकातील गर्दी पाहून स्वतः मोटारीतून खाली उतरले. आणि त्यांनी ट्रॅफिक सुरळीत करण्यास सुरुवात केली .
 काही वेळातच त्यांचे कार्यकर्ते दुर्वास कदम, सुयोग मगदूम,  सतीश जाधव हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. इतक्यात पाच ते सहा पोलीस ठिकाणी पोहोचले. वाहतूक सुरळीत केली.