+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Mar 24 person by visibility 2852 categoryजिल्हा परिषद
पाचगावमध्ये दहा कोटी ७२ लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण
महाराष्ट् न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मैदानासाठी सलामी ठोकली आहे, येत्या चार-पाच दिवसात मैदानाला सुरुवात होईल. त्या मैदानात विरोधकांचा योग्य समाचार घेऊ’असा सूचक इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यामध्ये आरोप, प्रत्यारोप होत आहेत. आमदार पाटील यांनी पाचगाव येथील कार्यक्रमात बोलताना विरोधकांना इशारा दिला.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव येथे दहा कोटी ७२ लाख निधीतून झालेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार ऋतुराज पाटील, सरपंच प्रियांका पाटील उपस्थित होते. यामध्ये नळपाणी पुरवठा योजना,रस्ता काँक्रीटीकरण,गटर्स,रस्ता रुंदीकरण,तसेच क्रीडांगण, आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच भैरवनाथ कुस्ती संकुलचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी, (१० मार्च) पाचगाव येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सर्वच नेते मंडळींनी, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. सतेज पाटील हे तांबडया मातीतील रांगडे पैलवान आहेत. त्यांनी डाव टाकला की समोरचा चितपट होतो असे मिश्किल टिप्पणी आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसमधील तरुण नेतृत्व हे धडाडीचे आहे. विकासकामांतून सामान्यांच्या उन्नतीचे ध्येय साध्य केले आहे. काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. सध्य स्थितीतही काँग्रेस जनतेसाठी भल्या भल्यासोबत कुस्ती करायला आणि विकासकामासाठी लढाईला तयार आहे. ’असे नमूद केले. आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणचे आमदार सतेज पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. आमदार म्हणून काम करताना ऋतुराज पाटील यांनी पाचगावच्या विकासाची दिशा बदलली असे सांगितले.
आमदार अमित देशमुख यांनी, ‘शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन काँग्रेस पुढे जात आहे. सध्याच्या गढूळ राजकारणाचा स्पर्श कोल्हापूरला झाला नाही. कोल्हापूर, सांगली, लातूर हे काँग्रेसचे गड अभेद्य आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सतेज पाटील यांची काळजी घेतली, आता सतेज पाटील यांनी माझी आणि विश्वजित कदम यांची काळजी घ्यावी.’असे म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हंशा पिकला. आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.
कुस्ती संकुलचे अध्यक्ष नारायण गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच सचिन पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी सरपंच संग्राम पाटील, चंद्रकांत सस्ते, शिवाजी ढेरे, बजरंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, शांताराम पाटील, अमित कदम, दिपाली गाडगीळ, अश्विनी चिले, रोमा नलवडे, पौर्णिमा कांबळे, माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ, प्रवीण कुंभार, विजय शिंदे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, कोअर कमिटी उपाध्यक्ष संजय पाटीलआदी उपस्थित होते.