+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Mar 24 person by visibility 215 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास प्राधीकरणातंर्गत करण्यात आलेल्या १४४८ कोटींच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. महापालिकेचा आराखडा व प्राधीकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हास्तरीय श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखडा समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये मंदिर  पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. सादर केलेला आराखडा बैठकीमध्ये मंजूर करून पुढील आवश्यक मंजुरी करता सरकारकडे पाठवण्याचे मंजूर करण्यात आले. 
 बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 महापालिकेने अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्याअंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्या आराखड्यात व नव्याने बनविण्यात आलेल्या अंबाबाई मंदिर विकास प्राधीकरण अंतर्गत बनविलेल्या आराखड्यात दर्शन मंडप, पार्कींग सारखी काही कामे आली आहे. या दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव  सरकारला पाठविण्यात आले आहेत. त्याची छाननी करताना एकच काम दोन्ही आराखड्यात असल्याने एका आराखड्यातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी अशी सूचना शासनाकडून आली आहे. ही दुरुस्तीची कामे वगळून सुधारीत आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.