+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Mar 24 person by visibility 134 categoryसामाजिक
राम गणेश गडकरी सभागृहात होणार कार्यक्रम
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे येत्या १४ व १५ मार्च २०२४ या कालावधीत  राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत रजनीसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता सुरु होणाऱ्या या संगीत रजनीचे आयोजन पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात करण्यात आले आहे.
 १९९१ ते जवळजवळ २००२ अशी सलग १२ वर्षे या संगीतरजनीचे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पंडीत राजन साजन मिश्रा, उस्ताद रशीद खान यांसारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांनी आपली गानकला सादर केली होती. हीच परंपरा पुढे अखंडित राहावी, या उद्देशाने यावर्षी राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूरला शास्त्रीय गायनाची परंपरा आहे, तसेच या सर्व कलांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने राजर्षी शाहू संगीत रजनीचे आयोजन शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने होणाऱ्या या संगीत रजनीमध्ये कोल्हापूरातील तसेच, बाहेरील नामवंत कलाकारांचा समावेश आहे.
ही दोन दिवसीय संगीत रजनी चार सत्रांमध्ये होईल. १४ मार्चला पहिल्या सत्रामध्ये पुण्याचे कृष्णा साळुंके व रोहीत खवळे यांचा पखवाजरंग हा पखवाजवादनाच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या सत्रामध्ये कोल्हापूरातील प्रसिध्द हार्मोनियम वादक पंडीत गोविंदराव टेंबे यांच्या व्यक्तीमत्वाचा शोध घेणारा गुणीगोविंद हा कार्यक्रम होईल. याची संकल्पना व निर्मिती संगीताचार्य पंडीत सुधीर पोटे यांची असणार आहे. यामध्ये पंडीत सुधीर पोटे, सौ. गौरी कुलकर्णी व सौ. गौरी पाटील यांचे गायन होणार आहे.
१५ मार्च, २०२४ रोजी प्रथम सत्रात कोल्हापुरातील नवोदित शास्त्रीय गायिका गौतमी चिपळुणकर तर द्वितीय सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका विदुषी अनुराधा कुबेर (पुणे) यांचे गायन होणार आहे.