+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Apr 24 person by visibility 52 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘सर्व्हेवर राजकारण चालत नाही जनताच सर्वेसर्वा असते तीच खासदार ठरवते.’, असा टोला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीचे  आमदार प्रकाश आवाडे यांना नाव न घेता लगाविला.
महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील लायन्स क्लबमध्ये मेळावा पार पडला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.  खासदार धैर्यशील माने यांनी ‘इचलकरंजी शहराला जे पाणी आणतो म्हणत आहेत, त्यांच्या शाहूवाडी गावात मी पाणी मंजूर करून आणले आहे.’असा टोला त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांना हाणला. 
खासदार माने म्हणाले, ‘ काहींना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचा आहे, असे सांगत आहेत. आम्हालाही मोदी यांनाच पंतप्रधान करायचा आहे. संसदेत मी राबत असल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. त्यामुळे मतदारसंघात मी दिसलो नसलेच. काम जो करतो, त्याच्यावर टीका होत असते. ज्या सुळकूडवरून माझ्यावर टीका केली जात आहे, त्यासाठी निधी मी मंजूर करून आणला आहे. पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
 भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, ‘ ‘ज्या बूथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते खासदार धैर्यशील माने यांना मिळवून देणार त्या बूथप्रमुखाचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी केलेली कामे घराघरात पोहोचवा.
यावेळी अशोक स्वामी, अश्विनी कुबडगे, अमृत भोसले, रवींद्र माने, पुंडलिकराव जाधव, विठ्ठल चोपडे,भाऊसो आवळे, माधुरी चव्हाण, श्रीकांत कांबळे, वैशाली डोंगरे, संतोष भोरे, अनिल डाळ्या, तानाजी पोवार, प्रसाद खोबरे, अलका स्वामी, अशोक पाटील, गजानन जाधवशहाजी भोसले, आदी उपस्थित होते.