+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Apr 24 person by visibility 61 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रभर प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी त्यांनी राजकीय जोडण्यासाठी भेटीगाठी घेतल्या. या मतदारसंघात महायुतीचे घटक असलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
आवाडे यांच्या घोषणेमुळे महायुतीमध्ये एकवाक्यता नाही हे ठळकपणे समोर आले. निवडणुकीच्या तोंडावर महायुती एकसंध आहे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या.या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी चर्चा केली. शनिवारी दुपारी शिंदे हे कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी हॉटेल पॅव्हेलियनमध्ये तब्बल पाच तास नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देऊन क्षीरसागर कुटुंबीयांचे सात्वंन केले. विश्वपंढरीतील मेळाव्याला उपस्थिती लावली.
त्यानंतर ते वारणानगर येथे जाऊन कोरे यांची भेट घेतली. रात्री बाराच्या सुमारास कणेरी मठावरील अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची भेट घेतली. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते शिरोळ तालुक्यातील नरंदे येथे पोहोचले. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत दोन तासाहून अधिक काळ चर्चा केली. यावेळी खासदार धैर्यशील माने त्यांच्यासोबत होते. शिंदे यांनी माले येथील शिवसेनेचे पदाधिकारी ओमकार चौगुले यांच्या निवासस्थानी भेट दिली. रविवारी सकाळी ते सव्वा सहाच्या सुमारास विमानाने मुंबईकडे रवाना झाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा पंचरंगी लढतीची चिन्हे आहेत.महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील, अपक्ष म्हणून आमदार प्रकाश आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील हे रिंगणात आहेत.