+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Mar 24 person by visibility 4497 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास योजनांना गती देण्यासाठी, योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागप्रमुखांनी दर बुधवारी-गुरुवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी द्यायच्या आहेत. आणि त्या संबंधींचा अहवाल शुक्रवारी साप्ताहिक बैठकीत सादर करायचा आहे. असे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले. शिवाय दोन दिवसापेक्षा जास्त काळ कोणतीही फाइल एका टेबलवर प्रलंबित राहणार नाही यापद्धतीने गतीमान कामकाज करण्याविषयी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
कार्तिकेयन एस यांनी बुधवारी, मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्तिकेयन एस हे २०२० मधील बॅचचे महाराष्ट्र केडरमधील आयएएस अधिकारी आहेत.ते मूळचे मदुराई येथील आहेत. सीए झाल्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. प्रत्येक विभागाची माहिती घेतली. 
सायंकाळी पत्रकारंशी बोलताना त्यांनी, ‘अधिकारी म्हणून काम करताना प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविण्यावर माझा प्रयत्न राहिला आहे. कोल्हापुरातही विकासाचे नवीन मॉडेल राबवू. विभागप्रमुखांना त्यांच्या विभागाच्या कामकाजासंबंधी सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. या माध्यमातून नवीन संकल्पना सामोरे येतील. शिक्षण, आरोग्यासह सगळेच विभाग विकासकामांच्या योजनेत अग्रेसर राहतील यादृष्टीने काम करायचे आहे.’
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभाग सक्षम आणि त्याद्वारे विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी यावर आपला फोकस राहील. 
डेव्हलमपेंट टुरिझम या संकल्पनेतंर्गत प्रत्येक विभागाची प्रभावशाली कामगिरी होईल. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने प्रयत्नशील राहीन. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना केल्या आहेत. पंचायत समित्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. पंचायत समित्यांचे इमारत भाडे, वीज बिल याबाबतीत त्या स्वयंपूर्ण बनल्या पाहिजेत. विकास योजनांच्या अंमलबजावणीसंबंधी नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पद्धतीने विकासकामे होतील.’असेही त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेवेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई उपस्थित होत्या.