+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसरकार बनाओ-नोटा कमाओ हा इंडिया आघाडीचा अजेंडा-नरेंद्र मोदींचा हल्लाबोल adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Mar 24 person by visibility 1369 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी कार्यभार हाती घेतला. बुधवारी सकाळी त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर दुपारच्या सत्रात मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. अधिकाऱ्यांच्या कडून माहिती जाणून घेतली. दरम्यान सीईओंनी प्रत्येक विभागाला भेटी द्यायला सुरुवात केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. ऑफिस अपडेट ठेवण्यापासुन ते फायली ठीकठाक करण्यापर्यंत सारेच कमालीचे सक्रिय झाले.
सीईओ कार्तिकेयन एस यांनी विविध भागांना भेटी देताना तेथील अडचणी जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई आदी उपस्थित होते. सीईओ कार्तिकेने मुख्यालयातील चारही मजल्यातील विविध विभागांना भेटी दिल्या. अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली. विविध विभागांना भेट देताना एक- दोन ठिकाणी त्यांनी स्वच्छतागृहांची पाहणी केली. स्वच्छतेसंबंधी सूचनाही केल्या.