+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustओसांडणारा उत्साह, भारावलेली मनं ! कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावली, स्वप्नांना गती लाभली !! adjustशिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर, अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना पुरस्कार adjustकोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या उपक्रमांना बळ देऊ - जगन्नाथ शिंदे adjustसहा ऑक्टोबरला कोल्हापुरात संविधान परिषद, डिजिटल लायब्ररीचा लोकार्पण सोहळा : राजेश क्षीरसागर adjustकेआयटीत स्टुडंट इंडक्शन, प्रथम वर्ष विद्यार्थ्याना तज्ज्ञांचे मार्गदर्शन adjustदेशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे संविधानाचे खरे उपासक -साहित्यिक कृष्णात खोत adjustलेटेस्टच्या मिरवणुकीत अवतरणार रामराज्य सोहळा, पुष्पक विमानाचा चित्ररथ adjustन्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये पदवी अभियांत्रिकी विभागाचे उद्घाटन दिमाखात adjust प्राध्यापकांच्या सुटाची सभा ठरली वादळी, घटना दुरुस्ती मंजूर-नामंजूरवरुन वादंग कायम adjustकागलात मुश्रीफांच्या पुढे नवा पेच, युवाशक्ती आक्रमक ! नेत्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा धर्म पाळा- आम्ही आमचा धर्म पाळतो
1000926502
1000854315
schedule07 Sep 24 person by visibility 128 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिला सुरक्षा व बाल सुरक्षा हा सार्वत्रिक चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांना पायबंद बसावा व महिलांच्या संरक्षणासाठी हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने सुरक्षाविषयक अॅपची निर्मिती केली आहे. मोबाइलमध्ये Needly Sos (निडली एसओएस) अॅप उपलब्ध केले आहे. माणगाव ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण अॅपमुळे संबंधित घटनेची माहिती त्वरित मिळण्याची, त्या ठिकाणी माहिती कळेल अशी सुविधा केली आहे. विशेष म्हणजे, कोणी मोबाइल हिसकावून घेऊन ही सुविधा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीचा फोटो आपोआप निघणार आहे.
या अॅपमुळे व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तेथील ठिकाणाची माहिती कुटुंबीयांना मिळेल. याकरिता चार वेळा पावर बटण दाबणे किंवा अॅपमधील एसओएस बटन दाबल्यास मोबाइलधारकाच्या कुटुंबांतील चार व्यक्तींना त्यासंबंधीची माहिती मिळणार आहे. तसेच घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ महिला अत्याचार प्रतिबंधक पोलिस विभागाकडे ११२ नंबरवर संपर्क साधण्याची सुविधा आहे.
‘माणगाव ग्रामपंचायतीने सुरक्षा तुमची जबाबदारी आमची या हेतूने हे अॅप सुरू केले आहे. गावातील सर्व पुरुष, मुले व महिलांना निडली एसओएस अॅप उपलब्ध केले आहे. शिवाय या सुविधेसाठी जो खर्च येणार आहे, तो ग्रामपंचायत करणार आहे.सुरक्षाविषयक या अॅपचा लाभ लोकांनी घ्यावा.’असे आवाहन सरपंच राजू मगदूम व उपसरपंच विद्या जोग यांनी केले आहे.