+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे adjustजनतेशी विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा- सतेज पाटील adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !! adjustकाँग्रेस नसती तर मुश्रीफ आमदारही झाले नसते ! व्ही.बी.पाटलांचे उत्तर adjust सरकारी नोकऱ्यांमध्ये संख्याशास्त्र विभागातील ३२ विद्यार्थ्यांची बाजी adjustमंडलिकाच्या प्रचारार्थ मुश्रीफांची बाजार समितीत मिसळ पे चर्चा adjustअमृतवरुन सत्ताधाऱ्यांचे नमते धोरण ! ज्यांना सहभागी व्हायचे नाही त्यांची रक्कम ठेवीकडे वर्ग !! adjustमहायुतीच्या विजयासाठी राजेश क्षीरसागरांचे शक्तीप्रदर्शन
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Apr 24 person by visibility 193 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक जणांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओढ पाहावयास मिळत आहे. महायुतीने दोनच दिवसापूर्वी कोल्हापूर शहरातील १०५ उमेदवारांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यावर कुरघोडी करत महाविकास आघाडीने बुधवारी २२८ माजी  नगरसेवकांचा पाठिंबा शाहू महाराजांना असल्याचे घोषित केले. या नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. सतरा माजी महापौर यावेळी उपस्थित होते. 
 देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून सुरू झाली पाहिजे, असा एल्गारही माजी नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आला. न्यू पॅलेस येथे झालेल्या माजी नगरसेवकांच्या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी महापौर महादेवराव आडगुळे, रामभाऊ फाळके, आर.के. पोवार, कांचन कवाळे, भीमराव पोवार, मारुतराव कातवरे, सई खराडे, सागर चव्हाण, वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, प्रतिभा नाईकनवरे, वैशाली डकरे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, अॅड. सुरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, निलोफर आजरेकर यांच्यासह २२८ माजी नगरसेवकांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
 लोकसभा निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघडीने १७ माजी महापौर आणि २२८ माजी नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत सत्ताधारी महायुती आघाडीवर चांगलीच कुरघोडी केली आहे. 
 शाहू छत्रपती म्हणाले, कोल्हापूरातील माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढे कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचे असून कोल्हापूरच्या विकासातील कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी भरपूर कामे केली असून त्यातील एकादे काम राहिले असेल तर त्याचा पाठपुरावा केला जाईल.  यावेळी माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ, राजू लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले.
...................................................
शाहू छत्रपतींनी सांगितल्या नगरसेवकांच्या आठवणी
शाहू छत्रपतींनी माजी महापौर रामभाउ फाळके, महादेवराव आडगुळे, आर.के. पोवार, सई खराडे, निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर सुशीला उर्फ माई रेडेकर, विनायक फाळके यांच्या आठवणी काढल्या. तब्बल २८ वर्षानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या फाळके यांचे महाराजांनी स्वागत केले. कोल्हापूरच्या पाणीप्रश्नांवर फाळके यांनी राजीनामा दिला होता अशी आठवण सांगत त्यांचे काम सतेज पाटील यांनी पूर्ण केले असे सांगितले. आडगुळे यांच्या कारकीर्दीत कोल्हापूरात महापौर परिषद झाली होती. शिवाजी पेठेत भेटल्यानंतर सई खराडे यांनी राजीनामा न देता अडीच वर्षे महापौरावर कायम रहावे असा सल्ला मीच दिला होता असे महाराजांनी सांगितले. माजी उपमहापौर माई रेडेकर यांच्याजवळ जात त्यांची विचारपूस केली. फुटबॉलमधील भांडणे बंद झाली पाहिजेत, अशी सूचना विनायक फाळके यांना केली.