+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे adjustजनतेशी विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा- सतेज पाटील adjustशाहू महाराजांच्या प्रचारार्थ बुधवारी शिव-शाहू निर्धार सभा adjustतंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुलसाठी निवड adjustमतदान टक्का वाढवा गोल्ड मेडल मिळवा ! जिल्हा परिषद करणार गौरव !!
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Apr 24 person by visibility 47 categoryजिल्हा परिषद
  महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण  महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनांत आणि घरांघरांत पोहोचूया. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी  यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकहिताच्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व जनते समोर मांडू. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणू या’असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री  चंद्रकात पाटील यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंत्री पाटील यांनी इस्लामपूर येथे बैठका घेतल्या. शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व घटक पक्ष व मित्र पक्ष यांच्या नेते मंडळींनी आपली भूमिका जाहीर केली.
 माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,  नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू. गत निवडणुकीमध्ये ८० हजाराचे मताधिक्य होतं ते टिकवून किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी जातीनिशी काम करू. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील , भाजपाचे  राहुल महाडिक , हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी,पै.भिमराव माने,पै.पृथ्वीराज पवार,नंदकिशोर निळकंठ, महीला आघाडी संपर्क प्रमुख सुनिता मोरे,जिल्हाप्रमुख अर्चना माळी,तालुकाप्रमुख प्रणाली लोंढे,शहर प्रमुख सतिश पाटील व शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.